आंबोली घाटात धावत्या कारवर कोसळले महाकाय झाड; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

बांदा-संकेश्वर मार्गावरील फणसवाडी येथील घटना; पोलीस आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे वाहतूक पूर्ववत

सावंतवाडी दि.१७: बांदा-संकेश्वर मार्गावरील आंबोली फणसवाडी येथे आज (१७ मे) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास एक अंगावर काटा आणणारी दुर्घटना घडली. एका धावत्या कारवर रस्त्यालगतचे महाकाय झाड अचानक कोसळले. या भीषण अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी पूर्णपणे सुखरूप असून एक मोठा अनर्थ टळला आहे.

आज सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास ‘GJ-15-CP-5778’ या क्रमांकाची कार आंबोली फणसवाडी परिसरातून जात होती. त्याच वेळी रस्त्याशेजारी असलेले एक मोठे झाड अचानक कारवर आणि थेट मुख्य रस्त्यावर कोसळले. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे बांदा-संकेश्वर मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली आणि काही क्षणांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

पोलिस आणि वन विभागाची ‘सुपरफास्ट’ तत्परता!
घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले.

यानंतर पोलीस, वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या कापून रस्ता मोकळा करण्यात आला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे काही वेळातच या मार्गावरील रखडलेली वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले.

ऐन अडचणीच्या वेळी आंबोली पोलीस आणि वनविभागाने दाखवलेली गतिशीलता आणि तत्परतेमुळे प्रवाशांचा मोठा मनस्ताप टळला. या तत्पर कामगिरीबद्दल वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून पोलीस प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

+++++++++++++++++++++++++

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*


🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here