कुडाळ माणगाव कट्टा येथे जुगारावर पोलिसांचा छापा; ७ जणांवर गुन्हा दाखल, २ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त

कुडाळ दि.२७: तालुक्यातील माणगाव कट्टा गाव येथे माडाच्या बागेत सुरू असलेल्या ‘अंदर-बाहर’ नावाच्या जुगारावर कुडाळ पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला. याप्रकरणी एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील एकाला पोलिसांनी जागीच पकडले आहे, तर उर्वरित ६ जण पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत पोलिसांनी ४ हजार ९०० रुपये रोख रक्कमेसह चार दुचाकी असा एकूण २ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कुडाळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, माणगाव कट्टा गाव येथील खेळण्याच्या मैदानाच्या लगत असलेल्या एका माडाच्या बागेत पोलिसांनी अचानकपणे छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी काही जण पैशांची पैज लावून अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांची गाडी पाहताच जुगाराच्या अड्ड्यावर एकच पळापळ झाली. यामध्ये ६ जण पळून गेले, मात्र पोलिसांनी गणपत धोंडी धुरी (वय ६१, रा. माणगाव बेनवाडी) याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने पळून गेलेल्या इतर ६ साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार विशाल विजय लाड (वय ४५, रा. माणगाव ढोलकरवाडी), सुनील बाबू भगे (वय ३५, रा. माणगाव बाजार), श्रीकांत अर्जुन केरकर (वय २७, रा. माणगाव तिठा), प्रकाश बाळकृष्ण लाड (वय ३८, रा. माणगाव ढोलकरवाडी), राजन शशिकांत मयेकर (वय ५०, रा. माणगाव कट्टावाडी) आणि सोमा बाबू सुकी (वय ५८, रा. माणगाव तिठा) अशी नावे निष्पन्न झाली आहेत. या सर्व सातही जणांवर पैशांवर जुगार खेळत आणि खेळवत असल्याप्रकरणी ‘महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ)’ नुसार कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून चार दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये ९५ हजार रुपये किमतीची बजाज फ्रीडम, प्रत्येकी ४५ हजार रुपये किमतीच्या दोन बजाज डिस्कव्हर आणि ४० हजार रुपये किमतीची पॅशन प्रो गाडी समाविष्ट आहे. या चार दुचाकी आणि घटनास्थळी सापडलेली ४ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस नितीन राजेंद्र शेडगे यांनी कुडाळ पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*

—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here