सावंतवाडीतील ‘ते’ धोकादायक होर्डिंग्ज तात्काळ हटवा

हाच तो धोकादायक फलक

 

हेच ते धोकादायक लोखंडी होर्डिंग्जनगरसेवक अजय गोंदावळे यांचा न प व सा.बां विभागाला आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी दि.३०: सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर असलेले लोखंडी होर्डिंग्ज अत्यंत जीर्ण झाले असून ते कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. हे धोकादायक होर्डिंग्ज पालिका प्रशासनाने तात्काळ हटवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक अजय गोंदावळे यांनी दिला आहे.

सावंतवाडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीसमोर गेल्या अनेक दिवसांपासून एक अजस्त्र लोखंडी होर्डिंग उभे आहे. सध्या या होर्डिंगची अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्याला गंज चढला आहे. हे स्ट्रक्चर कमकुवत झाल्याने ते कोणत्याही क्षणी कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते.

मुंबईत घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेची पुनरावृत्ती सावंतवाडीत होऊ नये, अशी भीती अजय गोंदावळे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की होर्डिंग अनेक दिवसांपासून दुर्लक्षित अवस्थेत आहे.रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या आणि वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.

या संदर्भात नगरसेवक गोंदावळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन या दोघांनाही धारेवर धरले आहे. “जर हे धोकादायक होर्डिंग तात्काळ काढले गेले नाही, तर नागरिकांच्या जीवासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल,” असा सज्जड दम त्यांनी दिला आहे.आता या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासन आणि बांधकाम विभाग खडबडून जागे होणार का आणि हे ‘मृत्यूचे सापळे’ हटवणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here