
सावंतवाडी : दीपावली आणि लक्ष्मी-कुबेर पूजनाचे औचित्य साधून सावंतवाडीचे भाजपाचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी शहरातील विविध बाजारपेठांना तसेच नागरिकांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन सावंतवाडीकरांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांनी सावंतवाडीतील प्रसिद्ध सुवर्ण पेठ आणि मुख्य बाजारपेठेसह विविध व्यापारी पेठांना भेट दिली. तेथे व्यापारी वर्गाकडून करण्यात आलेल्या देवी लक्ष्मीच्या प्रतिमांचे व मूर्तींचे दर्शन त्यांनी घेतले. शहरातील व्यापारी वर्गाच्या व्यवसायात उत्तरोत्तर भरभराट होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य व ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना ॲड. निरवडेकर यांनी याप्रसंगी केली.
बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी शहरातील नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करत दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांच्यासोबत नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे हेदेखील उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्याने व्यापारी आणि नागरिकांमधून आनंद व्यक्त करण्यात आला.


