36.3 C
New York
Saturday, July 4, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 17

सिंधुदुर्गात वन्यजीव तस्करीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; ९२ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना अटक!

रानबांबुळी येथे मोठी कारवाई: खवले मांजराची खवले आणि सांबराची शिंगे जप्त

सिंधुदुर्गनगरी दि.२९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीव तस्करीचे मोठे रॅकेट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) उद्ध्वस्त केले आहे. रानबांबुळी (ता. कुडाळ) येथे टाकलेल्या छाप्यात तब्बल ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमकी कारवाई काय?
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, रानबांबुळी येथील अनावकरवाडी परिसरात एलसीबीने सापळा रचला होता. शुक्रवारी सकाळी ११:४० च्या सुमारास संशयित हालचाली आढळल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत १.८०० किलो वजनाची दुर्मिळ खवले मांजराची खवले, सांबराची दोन शिंगे आणि दोन मोटारसायकली असा एकूण ९२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

अटक करण्यात आलेले आरोपी:
१. गणेश प्रदीप शिर्के (३०, रा. पडवे, कुडाळ)
२. विठोबा भगवान बावळेकर (८२, रा. रानबांबुळी)
३. शंकर यशवंत तारापूरे (३१, रा. पडवे)
४. कालिदास दत्तात्रय वारंग (५५, रा. सुकळवड, मालवण) कायदेशीर कारवाई:
आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९, ४४, ४९(ब), ५१ आणि बी.एन.एस. कलम ३(५) नुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, उपनिरीक्षक अनिल हडळ आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚨 सावंतवाडीत महावितरणचा ‘शॉक’! सत्ताधारी नगरसेवक आक्रमक… ⚡🥊

सावंतवाडीकरांचा संयम सुटला! दिवसातून १०-१२ वेळा वीज गुल; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकरांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना धरले धारेवर!

📌 काय आहे नेमकं प्रकरण?
पावसाळा तोंडावर आला असताना सावंतवाडी शहरात विजेचा मोठा खेळखंडोबा सुरू आहे. दिवसातून अनेकवेळा वीज खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी आणि नोकरदार हैराण झाले आहेत. या प्रश्नावर आज सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी थेट महावितरण कार्यालय गाठत अधिकाऱ्यांचा ‘पंचनामा’ केला.

🔥 बातमीतील महत्त्वाचे मुद्दे:
अजब तर्क: “एका फिडरच्या कामासाठी अख्ख्या शहराची वीज का घालवता?” – लोकप्रतिनिधींचा संतप्त सवाल.

जीर्ण खांबांचा धोका: मिलाग्रीस हायस्कूलसमोर खांब पडून विद्यार्थिनी जखमी; प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप.

सडेतोड जाब: “पावसाच्या तोंडावरच कामे कशी आठवतात?” आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांचा सवाल.

अंतिम इशारा: कामे तात्काळ मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा.

📢 बबन साळगावकर यांचा सज्जड दम:
“आम्ही सत्तेत असलो तरी जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरू! पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास गाठ आमच्याशी आहे.”

👥 उपस्थिती:
यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, महिला व बाल कल्याण समिती सभापती दिपाली भालेकर, नियोजन समितीचे सभापती आनंद नेवगी, नीलम नाईक, सुकन्या टोपले, विलास जाधव व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚨 महाकाय माती चोरी प्रकरण: संजू परब यांचा प्रशासनावर थेट हल्ला!

👉 “तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांची नार्को टेस्ट करा!” – माजी नगराध्यक्ष संजू परब यांची आक्रमक मागणी.

📍 सावंतवाडी / दोडामार्ग दि.२९:
आडाळी एमआयडीसीमध्ये मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या बेकायदेशीर खनिज उत्खनन आणि माती चोरीच्या प्रकरणावरून सिंधुदुर्गात राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट दोडामार्ग तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांवर या चोरीत सामील असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

📌 बातमीतील मोठे मुद्दे आणि थेट सवाल:
दोषी अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा: आडाळीत रातोरात झालेल्या खनिज उत्खननामागे आणि माती चोरीमागे मोठी टोळी सक्रिय असून, यात तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांचा हात आहे. त्यांची तात्काळ नार्को टेस्ट झाली पाहिजे.

८ एकर जमीन कोरली, प्रशासन झोपले होते का?: एखाद्या गरिबाने स्वतःच्या घरासाठी साधा डंपर नेला, तर महसूल विभाग दीड लाखांचा दंड ठोकतो. मग महिनाभर ८ एकर जमीन बेकायदेशीरपणे कोरली जात असताना पोलीस, तलाठी, ग्रामसेवक आणि तहसीलदार काय करत होते?

राजीनामा देण्याची मागणी: जर महिनाभर चाललेल्या या महाकाय चोरीची माहिती प्रशासनाला नसेल, तर त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत!

माहितीच्या अधिकारात मागवला हिशोब: या प्रकरणाची संपूर्ण सत्यता समोर आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत माहिती मागवण्यात आली असून लवकरच मोठे खुलासे समोर येतील.

⚠️ तीव्र आंदोलनाचा इशारा!
स्थानिक ग्रामस्थ गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घाबरून उघडपणे बोलत नाहीत. परंतु, या प्रकरणामागील ‘अदृश्य शुक्राचार्य’ कोण? याचा शोध घ्या. कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, तीव्र आंदोलन छेडू; असा थेट इशारा संजू परब यांनी दिला आहे.(यावेळी पत्रकार परिषदेला युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस उपस्थित होते.)

“टोळीच्या संमतीशिवाय एवढी मोठी चोरी शक्यच नाही. दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही!”
— संजू परब (जिल्हाप्रमुख, शिवसेना)

📢 ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या भागातील ताज्या अपडेट्ससाठी जोडलेले राहा!

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

पालकमंत्र्यांच्या आदेशाला अधिकारी जुमानत नाहीत; परशुराम उपरकर यांची घणाघाती टीका

कणकवली दि.२८: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि सत्ताधारी राणे कुटुंबाचे अधिकारी ऐकत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. खुद्द पालकमंत्र्यांच्या बंधूंनीच पोलिसांवर केलेल्या आरोपांवरून प्रशासनावर पालकमंत्र्यांचा वचक राहिला नसल्याचे सिद्ध होत आहे, अशी बोचरी टीका ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.

कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

प्रशासनावर पकड नसल्याचा आरोप
उपरकर म्हणाले की, जिल्ह्यात पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप विरोधक आधीपासूनच करत होते. आता आमदार नीलेश राणे यांनीच पोलीस अधीक्षकांवर निशाणा साधल्याने, पालकमंत्र्यांच्या आदेशाला अधिकारी ‘केराची टोपली’ दाखवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिक्षण विभाग आणि सेतू केंद्रातील सावळागोंधळ
पत्रकार परिषदेत उपरकर यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले:

शिक्षण विभाग: माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यावरील कारवाईचा विषय विधिमंडळात गाजूनही त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याचे पत्र देण्यात आले. यावरून जिल्हा परिषदेने दिलेली माहिती खोटी होती का? असा सवाल त्यांनी केला.

दाखल्यांचा प्रश्न: दहावी-बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी तहसील कार्यालयात तातडीची यंत्रणा असणे आवश्यक होते, मात्र तिथे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

तहसीलदारांची कार्यपद्धती: कणकवली तहसीलदार तक्रारींची दखल घेण्यासाठी बाहेर पडत नाहीत, मात्र उशिरापर्यंत कार्यालयात थांबतात, यामागे नक्की काय गौडबंगाल आहे? अशी विचारणा त्यांनी केली.

‘हिंदुत्वा’च्या मुद्द्यावरून पालकमंत्र्यांना घेरले
पालकमंत्र्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका करताना उपरकर म्हणाले की, “स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील शिवमंदिरासाठी केवळ १ लाख रुपये दिले, तर औरंगजेबाच्या कबरीसाठी अडीच लाखांचे अनुदान दिले. यावरून त्यांची दुटप्पी भूमिका समोर येते.”

विकासाच्या केवळ घोषणा
जिल्ह्यात भ्रष्ट अधिकारी महत्त्वाच्या पदांवर बसले असून पालकमंत्री केवळ मोठ्या घोषणा करण्यात मग्न आहेत. प्रत्यक्षात जिल्ह्याचा विकास खुंटला असून पालकमंत्री जिल्हा नियोजनात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

*हार्दिक शुभेच्छा*…….!वाढदिवस अभिष्टचिंतन!!

*हार्दिक शुभेच्छा*…….!

* सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकास सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा*

*शुभेच्छुक**__

*शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी*

* नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान*

* माजगाव जिल्हा परिषद विभागातील सर्व भाजपचे व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते*

सावंतवाडीच्या शैक्षणिक परंपरेचा नवा वारसदार: विक्रांत विकासभाई सावंत ‘भाईसाहेब आणि विकासभाईंचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास!’

वाढदिवसानिमित्त विशेष अभिष्टचिंतन !

सावंतवाडीच्या शैक्षणिक क्षेत्रात जवळपास ७९ वर्षांची देदीप्यमान परंपरा असलेल्या ‘सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ’ या ऐतिहासिक संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा आता एका तरुण, उच्चविद्याविभूषित आणि उमद्या नेतृत्वाच्या खांद्यावर आली आहे. ते नाव म्हणजे विक्रांत विकासभाई सावंत!
महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री (कै.) भाईसाहेब सावंत यांचे नातू आणि संस्थेचे माजी कार्यक्षम अध्यक्ष (कै.) विकासभाई सावंत यांचे सुपुत्र असलेल्या विक्रांत सावंत यांच्या रूपाने या संस्थेला तिसऱ्या पिढीचे सक्षम नेतृत्व लाभले आहे. नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळवून विजयी झालेले विक्रांतजी आज आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करत आहेत. या निमित्ताने त्यांच्या आजवरच्या प्रवासाचा आणि भविष्यातील संकल्पनांचा हा अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज चॅनल कडून घेतलेला वेध…

थोरामोठ्यांच्या नेतृत्वाचा जाज्वल्य आणि समृद्ध वारसा
सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचा इतिहास सन १८६५ पासूनचा आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री (कै.) पी. के. सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांनी सांभाळली आहे. यामध्ये सुभेदार मेजर विष्णू सावंत, अनंतराव कदम, यशवंतराव शृंगारे, बी. एस. देसाई, सखाराम सावंत, माजी आमदार प्रतापराव भोसले, ॲड. अ. ल. पाटणकर आणि वामनराव कदम यांसारख्या थोर व्यक्तींचा समावेश आहे.
यानंतर भाईसाहेब सावंत यांनी ३२ वर्षे आणि विकासभाई सावंत यांनी ३४ वर्षे आपल्या रक्ताचे पाणी करून या संस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेले. अशा या महान नेत्यांच्या खुर्चीवर बसून सेवा करण्याची मोठी जबाबदारी आता विक्रांत सावंत यांच्यावर आली आहे. स्वतः विक्रांतजी म्हणतात:
“या खुर्चीवर बसणे म्हणजे काटेरी मुकुट परिधान करण्यासारखे आहे. ज्या खुर्चीवर मुख्यमंत्री आणि थोर नेते बसले, तिचा मान राखून संस्थेची आणि सावंतवाडीच्या शैक्षणिक परंपरेची निस्वार्थ सेवा करणे हेच माझे अंतिम ध्येय आहे.”
ग्रामीण भागासाठी ‘केजी ते पीजी’ शिक्षणाची गंगा
संस्थेचे संस्थापक भाईसाहेब आणि विकासभाई यांनी केवळ सावंतवाडी शहरापुरते मर्यादित न राहता दोडामार्ग आणि चौकूळसारख्या दुर्गम, डोंगराळ भागातही शिक्षणाची दारे खुली केली.
चौकूळ येथे पदवीपर्यंतचे शिक्षण: गेल्या सात वर्षांपूर्वी चौकूळसारख्या भागात अकरावी-बारावीनंतर पदवीपर्यंतचे (ग्रॅज्युएशन) शिक्षण सुरू करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ आणि गावकर मंडळी आजही पदरमोड करून, दारोदारी जाऊन या शिक्षणासाठी मदत गोळा करतात, ज्याचा विक्रांतजींना सार्थ अभिमान वाटतो.
दोडामार्ग येथे अत्याधुनिक इमारत: दोडामार्ग येथील विद्यार्थ्यांसाठी सध्या अत्याधुनिक इमारतीचे काम सुरू असून, येथे शेजारच्या गोवा राज्यातील विद्यार्थीही शिक्षणाचा लाभ घेत आहेत. ‘लोकांनी दिलेल्या देणगीतून आणि विश्वासातून उभी राहिलेली ही संस्था आहे’ अशी कृतज्ञता ते व्यक्त करतात.
नव्या युगाचे शिक्षण: ‘एआय’ (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांनी विक्रांत सावंत यांच्या उच्चशिक्षित नेतृत्वाचे कौतुक करताना तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मोठी अपेक्षा व्यक्त केली आहे. आज जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून शिक्षणात मोठे प्रयोग होत आहेत. अमेरिकेत बसलेला शिक्षक सावंतवाडीतील मुलांना डिजिटल माध्यमातून शिकवू शकतो.
पालकमंत्री नीतेश राणे यांच्या मते, विक्रांत सावंत यांच्यासारखा तरुण आणि तंत्रस्नेही सहकारी पुढे आल्यामुळे सिंधुदुर्गच्या शिक्षण क्षेत्रात ‘नवी क्रांती’ घडून येईल आणि शाळांमध्ये ‘एआय’चा प्रभावी वापर निश्चितपणे केला जाईल. या परिवर्तनासाठी त्यांनी विक्रांतजींना पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.
पायाभूत सुविधा, क्रीडा क्रांती आणि नवे संकल्प
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही विक्रांत सावंत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. विकासभाईंनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केसरकरांनी त्यांना सदैव साथ देण्याचे आश्वासन दिले आहे. नूतन अध्यक्ष म्हणून विक्रांतजींनी अनेक महत्त्वाचे संकल्प सोडले आहेत:
राणी पार्वतीदेवी प्रशालेचा विकास: राणी पार्वतीदेवी प्रशालेमध्ये पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा विकासभाईंचा मानस पूर्णत्वास नेणे ही विक्रांतजींची पहिली प्राथमिकता आहे.
आधुनिक क्रीडा सुविधा (टर्फ): ‘आरपीडी’ हायस्कूलची ओळख खेळाडूंसाठी आहे. इथले हॉकी खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. आधी टर्फ नसताना चिखलात खेळणारे हे खेळाडू आता आधुनिक क्रीडा सुविधां अभावी मागे राहू नयेत, म्हणून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘टर्फ’ आणि योग्य ‘लॉन्च पॅड’ मिळवून देण्याचा १००% प्रयत्न विक्रांतजी करणार आहेत.
MPSC, UPSC आणि निवासी शाळा: कोकण विभागाचा निकाल नेहमीच १००% लागतो. या गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून संस्थेच्या वतीने लवकरच एमपीएससी, यूपीएससी अभ्यासक्रम मार्गदर्शन केंद्र आणि निवासी शाळा उपक्रम सुरू केला जात आहे. जेणेकरून इथली मुले भविष्यात आयएएस, आयपीएस, डॉक्टर आणि वकील बनू शकतील.
ज्येष्ठांचा आदर आणि ‘कॅप्टन’ म्हणून वाढलेली जबाबदारी
विक्रांत सावंत हे नेतृत्व केवळ आधुनिक विचारांचे नाही तर संस्कारांची जपणूक करणारे आहे. ते म्हणतात, “मी अध्यक्ष जरी असलो तरी हे नाममात्र पद आहे. मी प्रत्येक निर्णय माझ्यासोबत असलेल्या ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनानेच घेतो.” आज त्यांच्या पाठीशी सी. एल. नाईक, व्ही. बी. नाईक (वय ८६-८७), चं. मु. सावंत (वय ८८-९०) यांच्यासारखे अनुभवी मार्गदर्शक आणि प्रतिष्ठित शिक्षक, डॉक्टर, वकील, सीए उभे आहेत. या ज्येष्ठांनी एका तरुणाला ‘कॅप्टन’ म्हणून स्वीकारल्यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढल्याची जाणीव त्यांना आहे.
माजगाव जि.प. मतदारसंघाचे गतिमान नेतृत्व
शैक्षणिक क्षेत्रासोबतच विक्रांत सावंत यांना माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. गावचा सर्वांगीण विकास साधताना सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सेवा-सुविधा पुरवण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या विकासकामांना सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि जनतेकडून भरभरून पाठिंबा मिळत आहे.
सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाला लाभलेला ७९ वर्षांचा गौरवशाली वारसा विक्रांत विकासभाई सावंत यांच्या सुरक्षित आणि दूरदृष्टीच्या हातात सोपवला गेला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांनी घेतलेला हा शैक्षणिक व सामाजिक विकासाचा ध्यास यशस्वी होवो, हीच सदिच्छा!
तरुण, डॅशिंग आणि उच्चविद्याविभूषित नेतृत्व विक्रांत विकासभाई सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा!

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कुडाळ माणगाव कट्टा येथे जुगारावर पोलिसांचा छापा; ७ जणांवर गुन्हा दाखल, २ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त

कुडाळ दि.२७: तालुक्यातील माणगाव कट्टा गाव येथे माडाच्या बागेत सुरू असलेल्या ‘अंदर-बाहर’ नावाच्या जुगारावर कुडाळ पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकला. याप्रकरणी एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील एकाला पोलिसांनी जागीच पकडले आहे, तर उर्वरित ६ जण पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. या कारवाईत पोलिसांनी ४ हजार ९०० रुपये रोख रक्कमेसह चार दुचाकी असा एकूण २ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कुडाळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, माणगाव कट्टा गाव येथील खेळण्याच्या मैदानाच्या लगत असलेल्या एका माडाच्या बागेत पोलिसांनी अचानकपणे छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी काही जण पैशांची पैज लावून अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांची गाडी पाहताच जुगाराच्या अड्ड्यावर एकच पळापळ झाली. यामध्ये ६ जण पळून गेले, मात्र पोलिसांनी गणपत धोंडी धुरी (वय ६१, रा. माणगाव बेनवाडी) याला रंगेहाथ ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने पळून गेलेल्या इतर ६ साथीदारांची नावे पोलिसांना सांगितली. त्यानुसार विशाल विजय लाड (वय ४५, रा. माणगाव ढोलकरवाडी), सुनील बाबू भगे (वय ३५, रा. माणगाव बाजार), श्रीकांत अर्जुन केरकर (वय २७, रा. माणगाव तिठा), प्रकाश बाळकृष्ण लाड (वय ३८, रा. माणगाव ढोलकरवाडी), राजन शशिकांत मयेकर (वय ५०, रा. माणगाव कट्टावाडी) आणि सोमा बाबू सुकी (वय ५८, रा. माणगाव तिठा) अशी नावे निष्पन्न झाली आहेत. या सर्व सातही जणांवर पैशांवर जुगार खेळत आणि खेळवत असल्याप्रकरणी ‘महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ)’ नुसार कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून चार दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये ९५ हजार रुपये किमतीची बजाज फ्रीडम, प्रत्येकी ४५ हजार रुपये किमतीच्या दोन बजाज डिस्कव्हर आणि ४० हजार रुपये किमतीची पॅशन प्रो गाडी समाविष्ट आहे. या चार दुचाकी आणि घटनास्थळी सापडलेली ४ हजार ९०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण २ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस नितीन राजेंद्र शेडगे यांनी कुडाळ पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*

—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

महागाईविरोधात शिवसेनेचा कुडाळमध्ये धडक मोर्चा; पंतप्रधानांच्या जुन्या भाषणाची ऑडिओ क्लिप वाजवून केंद्र सरकारचा निषेध

कुडाळ, २७ : देशात सातत्याने वाढणारी महागाई आणि केंद्र सरकारच्या पोकळ आश्वासनांच्या निषेधार्थ आज कुडाळ शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने एक अनोखा आणि अत्यंत आक्रमक धडक मोर्चा काढण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामुळे कुडाळ शहराचा परिसर चांगलाच गाजला. “सखी सैय्या तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है…” या प्रसिद्ध गाण्याच्या सुरावटी आणि केंद्रातील मोदी सरकारच्या जुन्या भाषणांच्या ऑडिओ क्लिपने संपूर्ण आंदोलन परिसर दणाणून सोडला होता.

कुडाळ येथील जिजामाता चौक ते कुडाळ बसस्थानक दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये शिवसैनिकांनी आणि आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या भाषणांची वाजवली गेलेली ऑडिओ क्लिप. “पेट्रोल के दाम कम हुए की नही हुए? डिझेल के दाम कम हुए की नही हुए? महंगाई कम हुई की नही हुई?” या पंतप्रधानांच्याच जुन्या प्रश्नांचा पाढा ऐकवत शिवसैनिकांनी सरकारची चांगलीच कोंडी केली आणि त्यांच्यावर कडाडून टीका केली. एका बाजूला महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार मात्र केवळ आश्वासने देण्यात धन्यता मानत आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.

यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना माजी आमदार वैभव नाईक यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर तीव्र शब्दांत प्रहार केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा भाव सातत्याने वाढत असून रुपयाचा दर घसरत चालला आहे, अशी टीका करत पंतप्रधान डॉलरची ही घोडदौड आणि रुपयाची घसरण थांबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. त्यातच आता पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून सर्वसामान्यांना इंधन मिळणे कठीण झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पुढे बोलताना नाईक यांनी आगामी शेती हंगामाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. शेतकऱ्यांचा हंगाम अगदी तोंडावर आला असून शेतीकामांसाठी पेट्रोल-डिझेलची अत्यंत गरज भासणार आहे; अशा अवस्थेत बाजारात इंधनच उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. महागाईसोबतच सध्या गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटीचा विषयही त्यांनी यावेळी लावून धरला. या पेपरफुटीमुळे देशातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले गेले असून त्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आता या वाढत्या महागाईवर आणि समस्यांवर सरकार कसे आणि कधी नियंत्रण मिळवणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

या धडक मोर्चामध्ये माजी आमदार परशुराम उपरकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख कृष्णा धुरी, संतोष शिरसाट, संतोष कांदळकर, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, पंचायत समिती सदस्य अर्चना बंगे, ममता राऊळ, बबन बोभाटे, गुरु सडेकर, अमित राणे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडीच्या मोती तलावाचा होणार कायापालट..नितेश राणे;शासन आणि राजघराण्याच्या एकत्रित प्रयत्नांतून साकारणार भव्य प्रकल्प

सावंतवाडी,दि.२७: पारंपरिक वारसा आणि आधुनिकतेचा मेळ घालत सावंतवाडी शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटनात मैलाचा दगड ठरणाऱ्या ऐतिहासिक ‘मोती तलाव पुनरुज्जीवन आणि विकास प्रकल्पाचे’ नुकतेच भव्य सादरीकरण करण्यात आले.महाराष्ट्राचे बंदरे व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांच्या विशेष पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
​या महत्त्वपूर्ण सादरीकरणासाठी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष श्रद्धाराजे सावंत भोसले आणि युवराज लखमराजे सावंत भोसले यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा उपक्रम व्यापक जनहितासाठी शासन आणि राजघराणे यांच्या एकत्रित प्रयत्नांचे एक अद्वितीय प्रतीक आहे, असा विश्वास यावेळी मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
​आजच्या काळात महत्त्वाची वारसा पर्यटन केंद्रे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक शहरांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन ही व्यापक दूरदृष्टी योजना तयार करण्यात आली आहे. नामवंत संस्था ‘थर्टी स्क्वेअर’ आणि ‘आरजेबी-सीपीएल’ (रतन जे. बटलिबोई कन्सल्टंट्स प्रा. लि.) यांच्या भागीदारीतून, तसेच त्यांचे पर्यावरण भागीदार ‘एज्युकेटेड एन्व्हायर्नमेंट’ (ईडन एलएलपी) यांच्या तांत्रिक सहकार्याने हा आराखडा सादर करण्यात आला.​हा संपूर्ण प्रकल्प ‘लोकांसाठी, जागेसाठी, पाण्यासाठी’ या तीन मुख्य मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे. मोती तलाव हा केवळ एक पाण्याचा साठा नसून, तो शहरातून वाहणाऱ्या पाण्याचे नैसर्गिक संकलन केंद्र आहे. हे ऐतिहासिक महत्त्व ओळखून, या प्रस्तावात तलावाच्या काठावरील भिंतींची स्वच्छता, संवर्धन आणि स्थिरीकरण करून तलावाची संपूर्ण परिसंस्था पुनर्संचयित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे सावंतवाडीची सांस्कृतिक आणि सौंदर्यात्मक ओळख तर जगेलच, सोबतीला विचारपूर्वक आधुनिक विकासही साधला जाईल.
​स्थानिक वैशिष्ट्यांचा गौरव करत शाश्वत आणि सांस्कृतिकदृष्ट्या जागतिक पर्यटकांना आकर्षित करणे, ही या प्रकल्पाची मध्यवर्ती संकल्पना आहे. यासाठी तलाव परिसरात फूड पार्क, आधुनिक नौकाविहार सुविधा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भव्य उत्सव चौक उभारला जाईल. तसेच, कोकणची पारंपरिक लोककला असलेल्या ‘दशावतार नाटक’ आणि इतर स्थानिक कला प्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विशेष रंगमंडप आणि पारंपरिक घाटांच्या संकल्पनेतून प्रेरित शांत तलावाकाठच्या परिसराची निर्मिती केली जाणार आहे.
​मोती तलावाचा हा प्रस्तावित पुनरुज्जीवन प्रकल्प म्हणजे सावंतवाडीसाठी एक प्रगतीशील दृष्टिकोन आहे. हा प्रकल्प केवळ पर्यटन वाढवणार नाही, तर पर्यावरणीय जबाबदारी पाळत स्थानिक पातळीवर मोठ्या आर्थिक संधी आणि उपजीविका निर्माण करेल. वारसा आणि विकास, समुदाय आणि पर्यटन यांचा योग्य समतोल साधणारा हा प्रकल्प सावंतवाडीच्या भविष्याला नवी दिशा देणारा ठरेल, असा सूर या बैठकीत उमटला.

############################

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563