29.6 C
New York
Sunday, July 5, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 20

🌊 कोकण पर्यटनात क्रांती! मालवणच्या समुद्रात ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौका यशस्वीरित्या स्थापित! 🚢⚓

सिंधुदुर्ग (निवती रॉक) दि.१९: कोकणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! मालवण-वेंगुर्ला जवळील निवती रॉक समुद्रात देशातील पहिल्या ‘अंडरवॉटर म्युझियम’ (समुद्राखालील संग्रहालय) आणि ‘कृत्रिम प्रवाळ बेटा’साठी भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’ अखेर समुद्रतळाशी स्थापित करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांच्या प्रयत्नांनंतर, समुद्रातील खवळलेल्या वातावरणावर मात करत एमटीडीसीने (MTDC) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला!

📌 काय आहे ‘आयएनएस गुलदार’चा इतिहास आणि वैशिष्ट्ये?🇵🇱 पोलंड देशात निर्मिती, १९८५ मध्ये भारतीय नौदलात सामील.🇮🇳 श्रीलंका आणि अंदमान-निकोबार मोहिमांमध्ये शौर्याची कामगिरी.

📏 ८१ मीटर लांब, २२ मीटर उंच आणि तब्बल १,२०० टन वजनाची ही भव्य नौका आहे.🌊 गोव्याच्या दिशेने तोंड करून २२ मीटर खोल समुद्रात ही नौका विसावली आहे.🤿 पर्यटकांना कधी आणि कसा घेता येणार आनंद?पुढील १ ते दीड वर्षांत हे अंडरवॉटर म्युझियम पर्यटकांच्या सेवेत सुरू होईल.

स्कूबा डायव्हिंग सोबतच प्रस्तावित पाणबुडीद्वारे (Submarine) पर्यटकांना ही युद्धनौका समुद्राच्या पोटात जवळून पाहता येणार आहे.दोन वर्षांत या नौकेवर नैसर्गिकरीत्या सागरी जीवसृष्टी आणि प्रवाळ वाढणार असून, यामुळे स्कूबा डायव्हिंगला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे.

कोकणच्या ‘अंडरवॉटर टुरिझम’ला नवी दिशा देणारा हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या पर्यटनाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल यात शंका नाही! 😍👇

####################

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन

यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचा अनोखा उपक्रम

सावंतवाडी दि.१९: विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडावृत्ती, आत्मविश्वास व स्पर्धात्मक भावना विकसित करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, भोसले नॉलेज सिटी यांच्या वतीने ‘ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० व ३१ मे २०२६ रोजी भोसले नॉलेज सिटी परिसरात ही स्पर्धा संपन्न होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे._

_या स्पर्धेत रनिंग, सायकलिंग आणि शूटिंग या तीन प्रकारांचा समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांना वयोगटानुसार ८ ते १० वर्षे, १० ते १२ वर्षे आणि १२ ते १४ वर्षे अशा गटांमध्ये सहभागाची संधी उपलब्ध आहे. ३० मे रोजी पात्रता फेरी होणार असून, ३१ मे रोजी अंतिम फेरी रंगणार आहे. पात्र ठरलेल्या स्पर्धकांना अंतिम फेरीत आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे._

_ट्रायथलॉन ही एक बहुआयामी स्पर्धा असून त्यामध्ये सहभागी स्पर्धकांना तीन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये — रनिंग, सायकलिंग आणि शूटिंगमध्ये सहभाग घ्यावा लागतो. प्रत्येक प्रकारात स्पर्धकांच्या कामगिरीनुसार गुण दिले जातील. तिन्ही प्रकारांमधील एकत्रित गुणांच्या आधारे सर्वोत्तम सरासरी व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकाला विजेता घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ वेगाची नव्हे तर सहनशक्ती, अचूकता आणि सातत्यपूर्ण कामगिरीची खरी कसोटी ठरणार आहे._

_विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके, ट्रॉफी, पदके व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. स्पर्धा सर्व मुलांसाठी खुली असून व्यावसायिक प्रशिक्षण, सुरक्षिततेवर भर आणि अविस्मरणीय अनुभव अशा वैशिष्ट्यांमुळे मुलांना एक उत्तम व्यासपीठ लाभणार आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ९६२३३१०६९४ / ९१६७०७७९४० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

*साईल तळकटकर यांचा मनसे कडुन सत्कार*

सावंतवाडी दि.१८: महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा पुरस्कार प्राप्त साईल तळकटकर यांना कोकणची लोकप्रिय कलेतुन राज पाञ साकारून त्याला अभ्यासपुर्वक प्रबोधनाच्या माध्यमातुन पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि लोकांच्या मनात आदर युक्त स्थान निर्माण केल. दशावतार कंपनीतुन किंवा संयुक्त दशावतार यातुन आपली कला सादर केली हे हेरून राजधानी सेवा प्रतिष्ठान आणि अनुश्री फाऊंडेशन, कराड सातारा यांनी सर्व कलेचे परिक्षण करून कोकणातली दशावतार कलेतील कलाकारांचे परिक्षण करून सिंधुदुर्गातुन साईल तळकटकर यांचे नाव पुरस्कारावर कोरण्यात आले हा सन्मान सोहळा कराड, सातारा येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. साईल तळकटकर यांना पुरस्कार प्राप्त झाला हे कळताच मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी साईल तळकटकर यांच अभिनंदन केल आणि मनसे नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संपर्क अध्यक्ष संदिप दळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अॅड अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, जिल्हा सचिव गुरूदास गवंडे, दोडामार्ग तालुकाध्यक्ष विनायक सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलींद सावंत, तालुका सचिव सतिश आकेरकर, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, उमेश कदम इ. उपस्थित होते.

___________________________________

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*

🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚨 सावंतवाडीत “पोलिसांना पैसे देऊन कलमे हलकी केली!” 🚨 आरोपींची तक्रारदाराला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह! 🧐⚖️

📍 सावंतवाडी, सिंधुदुर्ग दि.१८: वेत्ये येथील अनधिकृत उत्खनन आणि मोजणी दरम्यान झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. व्हिडिओ पुरावे असूनही पोलिसांनी आरोपींना पाठीशी घातल्याचा गंभीर आरोप करत तक्रारदार श्री. महेश अंकुश सावंत यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

🛑 नेमका प्रकार काय?
३० एप्रिल रोजी मोजणी सुरू असताना बाबुराव तेंडोलकर, सुभाष राणे आणि प्रभाकर राणे यांनी महेश सावंत यांना मारहाण करत दगड उचलून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचे व्हिडिओ पुरावे असूनही सावंतवाडी पोलिसांनी खूनाच्या प्रयत्नाचे (कलम ३०७ सदृश) कलम लावले नसल्याचा आरोप होत आहे.

💸 “पैशांच्या जोरावर पोलीस मॅनेज केले?”
तक्रारदाराचा आरोप आहे की, आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून धमकी दिली – “आम्ही पोलिसांना पैसे देऊन हाफ मर्डरची कलमे लावू दिली नाहीत, साधी कलमे लावून घेतली आहेत. आमचा स्टेटस बघ, आमच्याकडे खूप पैसा आहे. तुला गाडीखाली घालून संपवून टाकू!” या धमकीमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.

उपोषणाचे अल्टीमेटम! ⏳
१५ मे रोजी महेश सावंत यांनी सावंतवाडी पोलीस स्टेशन समोर उपोषण केले होते. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी ‘रितसर तपास करून योग्य कलमे लावू’ असे तोंडी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र, येत्या ७ दिवसात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

🚔 पोलिसांचे काय म्हणणे आहे?
तपासात आतापर्यंत २ डंपर आणि १ मोटारसायकल जप्त.
तपास पारदर्शकपणे सुरू असल्याचा पोलिसांचा दावा.
आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित.
आता सर्वांचे लक्ष याकडे आहे की, पोलीस दबावाला बळी पडतात की तक्रारदाराला न्याय मिळतो? ⚖️

@@@@@@@@@@@@@

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
————————–

📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधुदुर्ग महिला बालविकास विभागाचा धक्कादायक कारभार!

मॅजिस्ट्रेटचे आदेश तरीही बालके योजनेपासून वंचित !

🔹 स्थान: कोलगाव-सावंतवाडी🔹 व्यथा: एकल माता स्मिता सचिन जाधव यांच्या ‘निल’ आणि ‘सिद्धी’ या दोन शालेय मुलांना दीड वर्षांपासून ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने’च्या (दरमहा ₹२२५०) लाभाची प्रतीक्षा.

🔹 कायदेशीर स्थिती: बालकल्याण समिती (बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट) यांनी ५ सप्टेंबर २०२४ रोजीच योजना मंजूर करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते.
🔹 दोष कोणाचा?: जिल्हा बाल संरक्षण कक्षाने या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा पालकांचा आरोप. कार्यालयातून कोणतीही लेखी माहिती दिली जात नसल्याने संताप.

👉 “गरिबांच्या हक्कावर गदा आणणारे महिला बालविकास विभागातील ‘झारीतील शुक्राचार्य’ कोण?” असा सवाल करत पीडित मातेने आता आयुक्तांकडे मागितला न्याय! या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी हीच सर्वसामान्यांची मागणी.

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
बेस्ट क्वालिटीस्वस्त दरात उत्तम खरेदी
मुलांना आवडेल अशी फॅशनपूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधुदुर्गात सहकाराचा नवा इतिहास! आंबोलीत २३ आणि २४ मे रोजी पतसंस्थांचे पहिलेच दोन दिवशीय भव्य अधिवेशन

५ कोटींपेक्षा जास्त खेळते भांडवल असलेल्या संस्थांचा होणार गौरव

सावंतवाडी दि.१७: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल पडत आहे. महाराष्ट्र राज्य सहकार कायद्यांतर्गत नोंदणी असलेल्या जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे पहिलेच दोन दिवशीय भव्य अधिवेशन शनिवार २३ मे आणि रविवार २४ मे रोजी आंबोली येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी दिली. हे अधिवेशन सहकार चळवळीला नवी दिशा देणारे आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन आणि पतसंस्थांचा गौरव: जिल्ह्यात सध्या नागरी, ग्रामीण बिगरशेती आणि पगारदार अशा एकूण १५० पतसंस्था उत्तम आर्थिक व्यवस्थापन करत कार्यरत आहेत. ज्या संस्थांनी सिंधुदुर्गात ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खेळते भागभांडवल उभे केले आहे, अशा सर्व संस्थांना या अधिवेशनात गौरव प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सावंतवाडीचे आमदार मा. दीपकभाई केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या हस्तेही संस्थांचा गौरव केला जाईल.
तज्ज्ञ मार्गदर्शकांचे लाभणार मार्गदर्शन: पतसंस्थांसमोरील आव्हाने आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दोन दिवसांत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे:
आदर्श उपविधी: जिल्हा उपनिबंधक मा. श्री. सोपान शिंदे (सिंधुदुर्ग).कर्ज वितरण व वसुली समस्या: श्री. आर. व्ही. यादव (पुणे).सायबर क्राईमचा धोका व सुरक्षा: श्री. पुंडलिक सातोसे.भविष्यातील आव्हाने व उपाययोजना: अॅड. दीपक पटवर्धन (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य फेडरेशन).ताणतणाव व्यवस्थापन: श्री. अशोक देशमुख (योगतज्ज्ञ, पुणे).
राज्यभरातील सहकार नेतृत्वाची उपस्थिती व खुले चर्चासत्र: या अधिवेशनासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलालजी सिंगी (छत्रपती संभाजीनगर), संचालक श्री. सुदर्शनराव भालेराव (बुलढाणा), आणि कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. गिरीश तुळपुले (अलिबाग) यांसारखे दिग्गज उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात संगणकीय तंत्रज्ञान आणि नव्याने येणारे एआय (AI) तंत्रज्ञान यावर खुले चर्चासत्र रंगणार आहे.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी फेडरेशनचे कार्याध्यक्ष श्री. जॉय डॉन्टस, उपाध्यक्ष श्री. नंदकिशोर कोरगावकर, श्री. सुनील नाईक, संचालक श्री. बाबूराव कविटकर, अॅड. समीर वंजारी, श्री. विष्णू पराडकर, श्री. सुभाष चौधरी, तज्ज्ञ संचालक श्री. रमेश बोंद्रे आणि सचिव श्री. महेश्वर कुंभार यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालय परिश्रम घेत आहे. जिल्ह्यातील सर्व पगारदार, नागरी व ग्रामीण पतसंस्थांनी या ऐतिहासिक अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी केले आहे.🔥 सिंधुदुर्गातील सहकार क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल! पतसंस्थांचे पहिलेच भव्य द्विवर्षीय अधिवेशन आंबोलीत! 👍📊

🗓️ दिनांक: २३ आणि २४ मे (शनिवार व रविवार) 📍 स्थळ: निसर्गरम्य आंबोली 🎤 उद्घाटक: श्री. नितेशजी राणे (पालकमंत्री, सिंधुदुर्ग)
🔹 अधिवेशनाचे मुख्य आकर्षण:
जिल्ह्यातील ५ कोटींपेक्षा जास्त खेळते भांडवल असलेल्या आदर्श पतसंस्थांचा भव्य सत्कार.
आमदार दीपकभाई केसरकर, आमदार डॉ. निलेशजी राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती.
🔹 या विषयांवर होणार मंथन: नवा आदर्श उपविधी, कर्ज वसुलीतील अडचणी, सायबर क्राईमपासून सुरक्षा, एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर आणि ताणतणाव व्यवस्थापन!
🔹 राज्यभरातून दिग्गज उपस्थित: राज्य फेडरेशनचे अॅड. दीपक पटवर्धन, डॉ. शांतीलालजी सिंगी, श्री. सुदर्शनराव भालेराव, आणि कोकण विभागाचे श्री. गिरीश तुळपुले करणार मार्गदर्शन.

🤝 “चला, एकत्र येऊया आणि सिंधुदुर्गातील सहकार चळवळ अधिक मजबूत करूया!” – श्री. सुनील राऊळ (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशन)

सहकार फ्लॅश: सिंधुदुर्ग आंबोली येथे २३ आणि २४ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यातील पहिल्याच दोन दिवशीय भव्य अधिवेशनाचे आयोजन; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ५ कोटींपेक्षा जास्त भांडवल असणाऱ्या पतसंस्थांचा होणार गौरव, राज्यभरातील सहकार महर्षींची लाभणार उपस्थिती.​🔥 सिंधुदुर्गातील सहकार क्षेत्रातील ऐतिहासिक पाऊल! 🔥
​📍 पतसंस्थांचे पहिलेच दोन दिवसीय भव्य अधिवेशन आंबोलीत रंगणार! 👉 जिल्ह्यातील १५० हून अधिक पतसंस्थांचे प्रतिनिधी होणार गोळा.
👉 ५ कोटींपेक्षा जास्त भागभांडवल असणाऱ्या यशस्वी पतसंस्थांचा होणार भव्य गौरव!
👉 प्रमुख उपस्थिती: पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार डॉ. निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी.👉 खास आकर्षण: पतसंस्थांमध्ये ए आय (AI) तंत्रज्ञानाचा वापर, कर्ज वसुली, सायबर क्राईम आणि ताणतणाव व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन!  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुनील राऊळ (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशन) यांचे आवाहन.

***********************

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*

🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सिंधुदुर्गात पत्रकारांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते ‘सिंधुदर्पण’ प्रकल्पाचे भूमिपूजन

सिंधुदुर्गनगरी (ओरोस) दि.१७: सिंधुदुर्गातील पत्रकारांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ओरोस (सिंधुदुर्ग नगरी) येथे साकारत असलेल्या ‘सिंधुदर्पण’ पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन आज अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषात पार पडले.

यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी, “हा प्रकल्प उत्कृष्ट दर्जासह आणि वेळेत पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे,” अशी ग्वाही दिली. तसेच “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोडलेली माणसं जपणं आणि त्यांनी सुरू ठेवलेला विकासाचा वारसा पुढे नेणं हीच माझी जबाबदारी आहे,” असे प्रतिपादनही त्यांनी केले.

विकासाचा वारसा पुढे नेणार: पालकमंत्री नितेश राणे
पत्रकारांविषयी आत्मीयता व्यक्त करताना पालकमंत्री राणे म्हणाले की, सिंधुदुर्गच्या जनतेने राणे कुटुंबावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. राणेसाहेबांनी मुख्यमंत्री आणि मंत्री म्हणून हजारो लोकांचे संसार उभे केले. पत्रकारांसाठी एका दर्जेदार गृहनिर्माण प्रकल्पाची गरज होती, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या खास शैलीत बोलताना त्यांनी प्रशासनाला संवेदनशील राहण्याचे आवाहन केले आणि म्हटले, “आमच्याकडे आउटगोइंग फ्री आहे आणि इनकमिंग बंद आहे… म्हणजे लोकांकडून काही घेण्याचा विषयच येत नाही, तर फक्त लोकांच्या अडचणी सोडवणे हेच आमचे काम आहे.”

राज्यासाठी आदर्श प्रकल्प: मान्यवरांचे गौरवोद्गार
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे: “काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प पूर्वी रखडला होता, मात्र २०२३-२४ नंतर त्याला प्रशासकीय गती मिळाली. राज्यात पत्रकारांसाठी अशा स्वरूपाचा गृहनिर्माण प्रकल्प उभारणारा सिंधुदुर्ग हा पहिलाच जिल्हा ठरत आहे.”

एस. एम. देशमुख (मुख्य विश्वस्त, मराठी पत्रकार परिषद): “या ऐतिहासिक प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय पालकमंत्री नितेश राणे यांना जाते. हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ ठरेल.”

प्रमोद कामत (अध्यक्ष, जिल्हा परिषद): “हा प्रकल्प केवळ इमारतींचा समूह नसून पत्रकार बांधवांच्या कुटुंबांना सुरक्षितता आणि स्थैर्य देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”
गुणवंत पाल्यांचा गौरव आणि मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, कार्यक्रमादरम्यान पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, ज्यामुळे सोहळ्याला एक कौटुंबिक आणि भावनिक किनार लाभली.

कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवर:
या सोहळ्याला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, ‘सिंधुदर्पण’ गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन संतोष राऊळ, सचिव दिलीप खडपकर यांच्यासह गणेश जेठे, संतोष वायंगणकर, शशी सावंत, शेखर सामंत, गजानन नाईक, सागर चव्हाण हरिश्चंद्र पवार, नरेंद्र देशपांडे रमेश बोंद्रे आणि जिल्ह्यातील पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा भूमिपूजन सोहळा सिंधुदुर्गातील पत्रकारितेच्या इतिहासात हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीचा एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

#######################

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

आंबोली घाटात धावत्या कारवर कोसळले महाकाय झाड; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

बांदा-संकेश्वर मार्गावरील फणसवाडी येथील घटना; पोलीस आणि वनविभागाच्या तत्परतेमुळे वाहतूक पूर्ववत

सावंतवाडी दि.१७: बांदा-संकेश्वर मार्गावरील आंबोली फणसवाडी येथे आज (१७ मे) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास एक अंगावर काटा आणणारी दुर्घटना घडली. एका धावत्या कारवर रस्त्यालगतचे महाकाय झाड अचानक कोसळले. या भीषण अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी पूर्णपणे सुखरूप असून एक मोठा अनर्थ टळला आहे.

आज सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास ‘GJ-15-CP-5778’ या क्रमांकाची कार आंबोली फणसवाडी परिसरातून जात होती. त्याच वेळी रस्त्याशेजारी असलेले एक मोठे झाड अचानक कारवर आणि थेट मुख्य रस्त्यावर कोसळले. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे बांदा-संकेश्वर मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली आणि काही क्षणांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

पोलिस आणि वन विभागाची ‘सुपरफास्ट’ तत्परता!
घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले.

यानंतर पोलीस, वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या कापून रस्ता मोकळा करण्यात आला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे काही वेळातच या मार्गावरील रखडलेली वाहतूक पूर्ववत करण्यात यश आले.

ऐन अडचणीच्या वेळी आंबोली पोलीस आणि वनविभागाने दाखवलेली गतिशीलता आणि तत्परतेमुळे प्रवाशांचा मोठा मनस्ताप टळला. या तत्पर कामगिरीबद्दल वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून पोलीस प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

+++++++++++++++++++++++++

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*

🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*

सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
बेस्ट क्वालिटीस्वस्त दरात उत्तम खरेदी
मुलांना आवडेल अशी फॅशनपूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

देवगड हादरले! संतापलेल्या युवकाचा शिरगाव PHC आणि देवगड शासकीय रुग्णालयात तुफान धिंगाणा!

महिला डॉक्टर, रुग्ण, पोलीस कर्मचारी व सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण; पोलीस गाडीसह खाजगी वाहनांची तोडफोड; संशयितावर गुन्हे दाखल!

देवगड दि.१६: तालुक्यात शासकीय रुग्णालयांमध्ये घुसून राडा करण्याची एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचारी व रुग्णाला मारहाण केल्यानंतर, या संशयिताने देवगड ग्रामीण रुग्णालयातही पोलीस कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांना मारहाण करत पोलिसांच्या गाडीसह एका खाजगी वाहनाची तोडफोड केली.

याप्रकरणी संशयित आरोपी राजा धर्मा गोरूड (वय ३३, रा. तुळशीनगर, देवगड) याच्याविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना: शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला डॉक्टरवर दगडफेक
पहिली घटना १५ मे रोजी रात्री १० ते ११:३० वाजण्याच्या सुमारास शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) घडली.

नेमके काय घडले?: येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋचा भुजंगराव भांडवले (वय २७) या रुग्णांची तपासणी करत असताना संशयित राजा गोरूड तिथे आला आणि त्याने आरडाओरडा सुरू केला. त्याने तेथील रुग्ण संतोष आरेकर याच्याकडे पैशांची मागणी केली.

अंगावर धावून जात धमकी: डॉ. भांडवले यांनी त्याला शांत राहण्यास सांगितले असता, संशयिताने थेट डॉक्टरच्या अंगावर धावून जात अश्लील शिवीगाळ केली आणि ‘बघून घेण्याची’ धमकी दिली.

दगडफेक: डॉक्टरच्या मदतीसाठी धावून आलेले आरोग्य कर्मचारी साईल रामटेके आणि डॉ. भांडवले यांच्यावर संशयिताने दगडफेक केली. याप्रकरणी डॉ. ऋचा भांडवले यांच्या फिर्यादीवरून देवगड पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव तपास करत आहेत.

दुसरी घटना: देवगड ग्रामीण रुग्णालयात पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व तोडफोड
पहिली घटना घडून काही तास उलटत नाहीत तोच, १६ मे रोजी रात्री १ ते पहाटे ४ च्या सुमारास देवगड ग्रामीण रुग्णालयात या संशयिताने दुसरा थरार घडवला.

पोलीस आणि सुरक्षा रक्षकावर हल्ला: शासकीय कर्तव्य बजावत असलेले देवगड पोलीस ठाण्याचे हवालदार गणपती मारूती गावडे, पोलीस कॉन्स्टेबल चालक विश्वास पाटील आणि पो.कॉ. रवींद्र महाले यांना संशयिताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने पो.कॉ. विश्वास पाटील यांच्या पाठीवर लाथा मारून दुखापत केली, तर रवींद्र महाले यांना थापटाने मारहाण केली.

कुंडी फेकून मारली: संशयिताने पोलिसांना ‘बघून घेण्याची’ धमकी देत रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक नाटेकर यांच्या अंगावर झाडाची कुंडी फेकून मारली.

वाहनांच्या काचा फोडल्या: एवढ्यावरच न थांबता संशयित राजा गोरूड याने रुग्णालयाच्या आवारात उभ्या असलेल्या पोलीस वाहनाच्या आणि एका खाजगी वाहनाच्या काचा फोडून शासनाचे नुकसान केले.

भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल
या दुसऱ्या घटनेप्रकरणी पोलीस हवालदार गणपती गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राजा गोरूड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३१, १३२, ३२४(३), ३५१(२)(३), ३५२ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११०, १११, ११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करत आहेत.

शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टर आणि पोलिसांवरच अशा प्रकारे हल्ले झाल्याने देवगड परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/