29.6 C
New York
Sunday, July 5, 2026

Buy now

spot_img
Home Blog Page 19

प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेची शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांसोबत सकारात्मक चर्चा; शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर!

पुणे (प्रतिनिधी)दि.२३:
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्याचे शिक्षण आयुक्त सचिनेंद्र प्रताप सिंह (IAS) तसेच प्राथमिक शिक्षण संचालक  शरद गोसावी यांची सदिच्छा भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या पदोन्नतीत सेवाज्येष्ठांवर कोणताही अन्याय होऊ नये, ही या भेटीमागील प्रमुख भूमिका होती. या बैठकीत एकूण ९ प्रमुख मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.

संघटनेच्या प्रमुख मागण्या आणि सद्यस्थिती:
🔹 टीईटी परीक्षा मुदतवाढ व पदोन्नती: शिक्षकांच्या सर्व पदोन्नत्या सेवाज्येष्ठतेनुसारच व्हाव्यात आणि न्यायालयीन निर्णयाचा आधार घेऊन टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळावी. तसेच पदोन्नतीसाठी निम्न सेवेची गणना करताना टीईटी अर्हतेची तारीख १ सप्टेंबर २०२५ ऐवजी १ सप्टेंबर २०२६ अशी ग्राह्य धरण्यात यावी.

🔹 जाचक अटी रद्द करणे व पदवीधर वेतनश्रेणी: उच्चश्रेणी मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांना ‘शिक्षण विस्तार अधिकारी’ पदावर पदोन्नती देताना लागू केलेली निकटतम पदावरील ३ वर्षांची अट रद्द करावी. तसेच नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी, ज्यावर शिक्षण संचालकांनी शासन स्तरावर सविस्तर कळवण्याचे आश्वासन दिले.

🔹 निवड श्रेणी व विद्यार्थ्यांचे प्रश्न: उच्च न्यायालय संभाजीनगरच्या निर्णयानुसार हिंगोली जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ तात्काळ दिला जावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे नोंदणीकृत ओळख क्रमांक उपलब्ध नाहीत, अशा विद्यार्थ्यांची शाळांनिहाय माहिती सादर करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत, जेणेकरून स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देता येतील.

🔹 विशेष रजा, वाहतूक भत्ता व गुणांची अट: उन्हाळी सुट्टीत जनगणना व ‘एसआयआर’ सर्वेक्षण केलेल्या शिक्षकांना ४५ दिवसांची विशेष अर्जित रजा मिळावी यासाठी शासन स्तरावर सकारात्मक पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन मिळाले. मात्र, या कामासाठी स्वतंत्र मानधन असल्याने वाहतूक भत्त्याबाबत थेट निर्णय घेता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. याशिवाय, सेवाज्येष्ठ शिक्षकांसाठी टीईटी गुणांची अट शिथिल करण्याबाबत इतर राज्यांचा आढावा घेऊन अभ्यासपूर्ण प्रस्ताव शासनास पाठवण्याचे प्रशासनाने मान्य केले.

शिष्टमंडळाची उपस्थिती:
या महत्त्वपूर्ण बैठकीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य उपाध्यक्ष व्ही. डी. देशमुख, हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी गोपाल साहू, अनिल राठोड, राजकुमार गाडे, रामचंद्र हरीमकर, रामदास गोरे व इतर शिक्षक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण संचालक आणि आयुक्त स्तरावर सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून, शिक्षकांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.*******************

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाला श्याम कलंबिस्तकर यांच्याकडून पुस्तके भेट; दिवंगत बंधू महेश कलंबिस्तकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम

वाचनालयाला पुस्तके भेट देताना सैनिक पतसंस्थेचे कर्मचारी श्याम कलंबिस्तकर. सोबत अॅड संतोष सावंत ,अनिल सावंत, रमेश सावंत, रुपा सावंत, दीपा जाधव आदी.

कलंबिस्त दि.२२: येथील ज्ञानमंदिर वाचनालयाला सावंतवाडीतील सैनिक पतसंस्थेचे कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते श्याम विश्राम कलंबिस्तकर यांनी आपले दिवंगत बंधू महेश कलंबिस्तकर यांच्या स्मरणार्थ ३ हजार १२० रुपये किमतीची नवीन पुस्तके भेटस्वरूपात दिली. गावातील वाचन संस्कृती टिकून राहावी आणि मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने हा कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला.

याप्रसंगी बोलताना श्याम कलंबिस्तकर म्हणाले की, “कलंबिस्त गावात ज्ञानमंदिर वाचनालयाची उभारणी करण्यात आली आहे. हे वाचनालय निश्चितच गावाच्या सर्वांगीण विकासाला आणि प्रगतीला गती देणारे ठरेल.”

या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक तथा वाचनालयाचे माजी सचिव ॲड. संतोष सावंत म्हणाले की, “श्याम कलंबिस्तकर यांनी वाचनालयाला पुस्तके देऊन गावातील मुलांमध्ये वाचनाची गोडी लागावी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांचा हा हेतू अत्यंत उत्तम असून ज्ञानमंदिर वाचनालय त्यांना अभिप्रेत असलेले काम निश्चितच करेल.”

या कार्यक्रमाप्रसंगी वाचनालयाचे सचिव अनिल सावंत, माजी अध्यक्ष रुपा सावंत, उपाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, आणि ग्रंथपाल दीपा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*

🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

लग्नाला नकार दिल्याने महिलेची निर्घृण हत्या; सावंतवाडीचा संशयित मुंबईतून जेरबंद, डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

डिचोली दि.२२: तालुक्यातील चिकणे-कुडणे परिसरात घडलेल्या शैला संजय घाडी (वय ५८) यांच्या निर्घृण हत्येप्रकरणातील फरार संशयिताला अटक करण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. सागर रमेश राऊळ (वय ३४, रा. सावंतवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. मृत महिलेच्या धाकट्या मुलीशी विवाह करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून संशयिताने हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेमुळे शांत समजल्या जाणाऱ्या चिकणे-कुडणे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून डिचोली पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली होती. संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सावंतवाडी, कोल्हापूर आणि मुंबईपर्यंत जाळे विणले होते.

अखेर आधुनिक तंत्रज्ञान आणि मोबाईल लोकेशनचा आधार घेत, मुंबई पोलिसांच्या सहकार्याने पोलिसांनी सागर राऊळ याला मीरा भाईंदर-ठाणे परिसरातून ताब्यात घेतले. त्याला तेथील प्रथम श्रेणी न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी हजर करण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला गोव्यात आणले जाईल. या हत्येमागे आणखी काही पूर्वनियोजन होते का, याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

बांदा-इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई; ट्रकसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा दि. २१: मुंबई-गोवा महामार्गावरील बांदा-इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर आज पोलिसांनी मोठी कारवाई केली. नियमित वाहन तपासणी सुरू असताना गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला असून, ट्रकसह एकूण १० लाख २३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
आज बांदा-इन्सुली नाक्यावर पोलीस कॉन्स्टेबल राकेश चव्हाण आणि श्री. हेरलेकर हे कर्तव्यावर असताना वाहनांची तपासणी करत होते. यावेळी संशयास्पद वाटणारा ट्रक क्रमांक (MH 08 W 1122) थांबवून त्याची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान ट्रकमध्ये लपवून ठेवलेला गोवा बनावटीच्या दारूचा साठा पोलिसांना मिळून आला.

घटनेची माहिती मिळताच एएसआय नाईक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमधून खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे:

ओक्स्मीत कंपनीची दारू: १२ बॉटल्सचा बॉक्स (किंमत ₹९,३६०) रॉयल स्टॅग व्हिस्की: १५ बॉटल्सचा बॉक्स (किंमत ₹११,१००) हेवर्ड फाईन व्हिस्की: १२ बॉटल्सचा बॉक्स (किंमत ₹३,०००) आयशर ट्रक: अंदाजे किंमत ₹१०,००,००० एकूण जप्त मुद्देमाल: ₹१०,२३,४६०

कायदेशीर कारवाई
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राकेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अवैध वाहतुकीमागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

महत्त्वाची नोंद: गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, अवैध अमली पदार्थ आणि दारू तस्करी रोखण्यासाठी तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
###################

सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…
—————————
लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*

👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*

🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

⛈️ कोकणात अवकाळीचा इशारा: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात वादळी पावसाची शक्यता!

कोकणातील पाऊस

कोकण किनारपट्टी दि.२१: भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकणवासीयांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या २४ मे पर्यंत दक्षिण आणि मध्य कोकणात विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

📍 जिल्ह्यानुसार हवामानाचा अंदाज:
रायगड: आज २१ ते २३ मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस, तर २४ मे रोजी हवामान कोरडे राहील.

रत्नागिरी: २२ ते २४ मे दरम्यान हलक्या पावसाची शक्यता कायम आहे.

सिंधुदुर्ग : उद्या जोरदार वादळी वाऱ्याचा इशारा. ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

मुंबई व ठाणे: आज (२१ मे) ‘थंडर्सॉवर’ची शक्यता आहे. पालघरमध्ये मात्र हवामान कोरडे राहील.

🌾 शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ‘अॅग्रोमेट’ सल्ला:
हवामान विभागाने पिकांच्या सुरक्षेसाठी खालील सूचना दिल्या आहेत:
काढणी: तयार झालेली पिके तातडीने कापून सुरक्षित ठिकाणी साठवावीत.
संरक्षण: काढणी केलेले पीक मळणीसाठी उपलब्ध नसल्यास ताडपत्रीने व्यवस्थित झाकून ठेवावे.
आधार: वादळी वाऱ्यामुळे नुकसान टाळण्यासाठी फळबागा व भाजीपाल्याला बांबूचा आधार द्यावा.
फवारणी टाळा: या काळात पिकांना पाणी देणे किंवा औषध फवारणी करणे टाळावे.
पशुधन: जनावरांना विजांपासून वाचवण्यासाठी सुरक्षित गोठ्यात बांधून ठेवावे.

⚠️ नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी:
मेघगर्जना सुरू असताना शेतात किंवा खुल्या मैदानात काम करणे टाळा.
उंच झाडे किंवा कच्च्या घरांचा आश्रय घेऊ नका.
घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा.
विजा चमकत असताना नदी, विहीर किंवा पाण्यात राहू नका, त्वरित बाहेर या.
####################

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

सावंतवाडी पंचायत समितीच्या बैठकीत अधिकारी चक्क ‘मटक्याचे आकडे’ पाहण्यात व्यस्त;

 व्हिडिओ व्हायरल,उपसभापती गौरव मुळीकांकडून भर सभागृहात अधिकाऱ्याची कानउघाडणी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

सावंतवाडी दि.२१: जनतेच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा सुरू असताना, शासकीय बैठकीचे गांभीर्य पायदळी तुडवून बांधकाम विभागाचा एक जबाबदार अधिकारी चक्क आपल्या मोबाईलवर ‘मटक्याचे आकडे’ पाहण्यात मग्न असल्याचा धक्कादायक प्रकार सावंतवाडीत उघडकीस आला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, संबंधित अधिकाऱ्याच्या बेजबाबदार वर्तणुकीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमका प्रकार काय?
आज सावंतवाडी पंचायत समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील विकासकामे, पाणीप्रश्न आणि पावसाळ्यापूर्वीच्या नियोजनावर सभागृहात चर्चा सुरू असताना, बांधकाम विभागाचे हे अधिकारी कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून मोबाईलमध्ये मटक्याचे आकडे तपासत होते. त्यांच्या बाजूला बसलेल्या काही सतर्क व्यक्तींनी हा प्रकार ओळखून आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

गौरव मुळीक यांनी भर सभागृहात सुनावले
हा प्रकार उपसभापती गौरव मुळीक यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बैठकीच्या शिस्तीचा भंग करणाऱ्या या अधिकाऱ्याची त्यांनी भर सभागृहात कानउघाडणी केली. नाव न घेता, “महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू असताना अशा प्रकारे मोबाईलचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही,” अशी कडक तंबी मुळीक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

जनतेतून संताप: कारवाई होणार का?
सर्वसामान्यांच्या करातून पगार घेणारे उच्चपदस्थ अधिकारी जर शासकीय कामाच्या वेळी जुगाराचे आकडे पाहणार असतील, तर जनतेच्या प्रश्नांचे काय? असा सवाल आता सावंतवाडीतील नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली असून, जिल्हा प्रशासन या ‘मटकाप्रेमी’ अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.****************************

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदांची घोषणा; सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी अरविंद मोंडकर

नवी दिल्ली दि.२१: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस आणि खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांची अधिकृत घोषणा केली आहे. पक्षाने जारी केलेल्या यादीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक फेरबदल करत नवीन आणि अनुभवी नेत्यांना संधी दिली आहे.

यात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. अरविंद नामदेव मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकणातीलच शेजारील रत्नागिरी जिल्ह्यात उत्तर भागाची जबाबदारी कु. सोनललक्ष्मी वीरधवल घाग यांच्याकडे, तर दक्षिण रत्नागिरीची धुरा श्री. जमीर खलिफे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. रायगड उत्तरमध्ये डॉ. मनीष अनंत पाटील आणि रायगड दक्षिणमध्ये श्री. राजेंद्र मधुकर ठाकूर (राजा भाऊ) संघटन सांभाळतील.

पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता, सांगली ग्रामीणच्या अध्यक्षपदी आमदार श्री. विक्रमसिंह बाळासाहेब सावंत यांची नियुक्ती कायम ठेवत पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे,

#########################

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

🚨 …तर त्याला महावितरण जबाबदार राहील! सावंतवाडीत शांतता समिती बैठकीत तीव्र संताप

📍 सावंतवाडी दि.२०:सावंतवाडीत सर्व धर्मीय नागरिक सण-उत्सव नेहमीच गुण्यागोविंदाने आणि शांततेत साजरे करतात. मात्र, सध्या शहरात सुरू असलेल्या विजेच्या तीव्र लपंडावामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या वीज समस्येमुळे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याला थेट वीज वितरण कंपनी (महावितरण) जबाबदार राहील, असा इशारा शांतता समितीच्या सदस्यांनी दिला आहे.

आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी शहरातील विविध ज्वलंत समस्यांवर जोरदार चर्चा झाली.

⚡ विनाकारण वीज खंडित; लोकांमध्ये उद्रेक!
बैठकीत पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या कोणताही पाऊस किंवा विजांचा कडकडाट नसतानाही सकाळपासून वारंवार वीज खंडित केली जात आहे. सणासुदीच्या काळात यामुळे शांतता भंग होऊ नये, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच या गंभीर समस्येबाबत वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कळवण्याची विनंती पोलीस निरीक्षकांना करण्यात आली.

🚦 वाहतूक कोंडी आणि इतर प्रमुख नागरी प्रश्न:
वाहतूक कोंडीचा विळखा: पर्यटन हंगाम सुरू असल्याने शहरात बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गवळीतिठा, जयप्रकाश चौक, गांधी चौक आणि मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

एसटी स्थानक परिसर: नगरपरिषदेसमोरील बसस्थानक परिसरात वाहने अस्ताव्यस्त उभी राहणार नाहीत याची दक्षता घेऊन वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची मागणी झाली.मोकाट जनावरांचा त्रास: शहरात मोकाट कुत्रे आणि गुरांचा वावर वाढल्याने पादचारी व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बेकायदेशीर जाहिरात फलक: चिटणीसनाका येथील मोती तलावाच्या सांडव्याजवळ लावले जाणारे जाहिरात फलक न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून हटवण्यात यावेत, याकडे लक्ष वेधण्यात आले.

🤝 पोलिसांचे सकारात्मक आश्वासन
प्रभारी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी सावंतवाडीच्या सलोख्याच्या परंपरेचे कौतुक केले. बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या वीज, वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांबाबत संबंधित शासकीय विभागांशी तातडीने समन्वय साधून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

इस बैठकीला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. नकुल पार्सेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, आगोस्तीन फर्नांडिस, हवालदार अमित राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

#################

*सावंतवाडीच्या Baby’s World मध्ये धमाकेदार SALE सुरू…*
—————————
*लहान मुलांच्या कपड्यांवर आता मिळवा भारी सूट* 😍
*🛍️ 30% 40% 50% पर्यंत सूट*
📅 ऑफर कालावधी : 15 मे ते 30 मे
*येथे मिळतील 👇*
👗 फ्रॉक व ड्रेस🧥 स्वेटर👕 शर्ट व टी-शर्ट👖 लेगिंग्ज🎒 शाळेच्या बॅग🧥 रेनकोट आणि मुलामुलींसाठी इतर आकर्षक साहित्य ✨
✅ बेस्ट क्वालिटी ✅ स्वस्त दरात उत्तम खरेदी
✅ मुलांना आवडेल अशी फॅशन ✅ पूर्ण विश्वास, पूर्ण समाधान
*📞 आजच संपर्क करा : +91 94054 96776*
🛑/——–/🛑——-/🛑——🛑/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

: 🚨 सावंतवाडीत आज कडकडीत ‘मेडिकल बंद’! 🚨

⚠️ ऑनलाईन औषधविक्रीविरोधात औषध विक्रेत्यांचे देशव्यापी आंदोलन; तालुक्यात मोठा प्रतिसाद!

सावंतवाडीतील बंद असलेले वेलनेस फोरेव्हर सेंटर

📍 सावंतवाडी दि.२०: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाला सावंतवाडी तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. काल मध्यरात्री १२ वाजेपासून आज मध्यरात्रीपर्यंत तालुक्यातील १२५ हून अधिक औषध दुकाने कडेकोट बंद ठेवण्यात आली आहेत. गेले काही दिवस काळी फीत बांधून निषेध नोंदवल्यानंतर आज विक्रेत्यांनी दुकाने पूर्णपणे बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला.

🎯 प्रमुख मागण्या काय आहेत?
❌ ऑनलाईन औषधविक्री तात्काळ बंद करा.
💸 कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिली जाणारी अव्यवसायिक डिस्काउंटबाजी थांबवा.
📜 २८.०८.२०१८ आणि २६.०३.२०२० ची वादग्रस्त अधिसूचना मागे घ्या.
🛡️ बनावट औषधांच्या धोक्यापासून देशाला वाचवा.

👥 रुग्णांचे हाल; पण आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष व्यवस्था!
अचानक मेडिकल बंद झाल्याने औषध खरेदीसाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना माघारी परतावे लागत आहे. विशेष म्हणजे वेलनेस सेंटर सुद्धा बंद असल्यामुळे रुग्णांची मोठी कर्ज झाली आहे,मात्र, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून संघटनेतर्फे आपत्कालीन परिस्थितीत औषध पुरवठा करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनही (FDA) परिस्थितीवर लक्ष ठेवून सज्ज आहे.

***********************†******†*******