लोकनेते भाईसाहेब सावंत यांची १०२ वी जयंती उत्साहात

सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील समाधीस्थळी लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना आमदार दीपक केसरकर सोबत विक्रांत सावंत, संजू परब, बबन साळगावकर,अमोल सावंत, अशोक दळवी, संदीप राणे आदी

माजगाव समाधी स्थळी मान्यवरांची मांदियाळी

सावंतवाडी दि.०४ महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री, लोकनेते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांची १०२ वी जयंती बुधवारी माजगाव येथील त्यांच्या प्रेरणा समाधी स्थळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

पुष्पांजली आणि अभिवादन
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांच्या हस्ते स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या समाधीवर आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोकनेते भाईसाहेब सावंत यांच्या कार्याचा वारसा आणि त्यांनी कोकणच्या विकासासाठी दिलेले योगदान यावेळी अधोरेखित करण्यात आले.

याप्रसंगी भाईसाहेब सावंत प्रेमी, त्यांचे नातेवाईक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रामुख्याने उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये खालील व्यक्तींचा समावेश होता.राजकीय व सामाजिक नेतृत्व: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, बबन साळगावकर, अमोल सावंत, प्रदीप सावंत, अजित सावंत.

शिक्षण व अन्य क्षेत्रातील व्ही. बी. नाईक, चंद्रकांत नाईक, अशोक दळवी, ॲड. दिलीप नार्वेकर, संजय कानसे, रवींद्र म्हापसेकर, संदीप राणे, डॉ. दिनेश नागवेकर.इतर मान्यवर: प्रसाद सावंत, म. ल. देसाई, राजू कुबल, सचिन बिर्जे, संजय लाड, अर्चित पोकळे, मेघश्याम काजरेकर, प्रा. धीरेंद्र होळीकर, एस. पी. नाईक, प्रा. सतीश बागवे आदी.यावेळी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भाईसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला.माजगांव समाधी स्थळ परिसरात यावेळी अत्यंत प्रेरणादायी वातावरण होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here