*’कमळ’ फुलणारच!* *विशाल परब यांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग

भाजप युवा नेते विशाल परब याचा दोडामार्ग तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा

*दोडामार्गमध्ये महायुतीचा झंझावात! विशाल परब यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह*

दोडामार्ग दि. ०४: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे उमेदवार प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते विशालजी परब यांनी तालुक्यात झंझावाती दौरा केला. या दौऱ्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, ठिकठिकाणी होणाऱ्या गाठीभेटींना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलताना विशाल परब यांनी विश्वास व्यक्त केला की,दोडामार्ग तालुक्याच्या विकासासाठी महायुती कटिबद्ध आहे. जनतेचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर पूर्ण विश्वास असून, हा विश्वास आगामी निवडणुकीत आशीर्वादाच्या रूपाने मतांमधून नक्कीच दिसून येईल. महायुतीचा सर्व कार्यक्षम नेतृत्व उमेदवार जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देईल.

या झंझावाती दौऱ्यात विशाल परब यांच्यासोबत अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती.यामध्ये भाजपा जिल्हा परिषद अधिकृत उमेदवार दिपक गवस, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, ज्येष्ठ नेते रंगनाथ गवस,
युवा पदाधिकारी देवा शेटकर आदी उपस्थित होते. यावेळी गावागावात झालेल्या कोपरा सभा आणि गाठीभेटींमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. दोडामार्ग तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि पाठिंबा पाहता, महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here