राष्ट्रीय शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धेत ग्रेटा कर्पे हिला सुवर्ण

ग्रेटा कर्पे

सावंतवाडी दि.०४: 5वी राष्ट्रीय सब ज्युनिअर, ज्युनिअर, सीनिअर शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. या स्पर्धेत ग्रेटा महेश कर्पे हिने सुवर्णपदक पटकावले. ती कुपवाड येथील जिद्द स्पोर्ट्स फौंडेशनची खेळाडू आहे.
या स्पर्धा महा शस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित केल्या होत्या. स्पर्धेत मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील तसेच हरियाणा, पंजाब आदी राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेतील एअर शिल्ड प्रकारात ग्रेटा हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्यासाठी तिला महाराष्ट्र राज्य प्रमुख मिलिंद काटमोरे, सांगली जिल्हा अध्यक्षा काजल लोंढे, सचिव प्रथमेश लोंढे, पारस माने, वैभव शिंदे, शुभम लांडगे आदींचे मार्गदर्शन, तसेच वडील महेश व आई स्वाती यांचे प्रोत्साहन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here