लोकप्रतिनिधीच ठेकेदार झाल्याने विकासकामांचा दर्जा खालावला!

कोलगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना अपक्ष उमेदवार मायकल डिसोझा सोबत कार्यकर्ते.

अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांचा घणाघात; ‘फूड कोलगाव मतदारसंघात रोजगारावर भर देणार; प्रोसेसिंग’द्वारे तरुणांना कामाची संधी देणार

सावंतवाडी दि.४ : “मतदारसंघात सिमेंट-काँक्रीटची कामे दिसत असली, तरी रोजगाराच्या अभावामुळे इथली घरे रिकामी होत आहेत. गेल्या काही वर्षांत लोकप्रतिनिधीच स्वतः ठेकेदार बनल्यामुळे कामांचा दर्जा खालावला असून जनतेच्या पैशाची लूट होत आहे,” अशी सडेतोड टीका कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे अपक्ष उमेदवार मायकल डिसोजा यांनी केली. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रोजगाराला प्राधान्य: निवडून आल्यास मतदारसंघात ‘फूड प्रोसेसिंग युनिट’ (अन्न प्रक्रिया उद्योग) सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगाराची दालने खुली करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निकृष्ट कामांचा पर्दाफाश: विकास ही निरंतर प्रक्रिया असली, तरी सध्याचे लोकप्रतिनिधी स्वतःच ठेकेदारीत गुंतले आहेत. मलाई खाण्याच्या नादात कामांकडे दुर्लक्ष झाल्याने मतदारसंघ मागे राहिला आहे, असा आरोप डिसोजा यांनी केला.

नागरी समस्यांवर प्रहार: कोलगाव परिसरात राहणाऱ्या प्रतिष्ठित नागरिकांना रस्ते आणि पथदीपांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. कारीवडे येथील कचरा प्रकल्प हलवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

सेवेचा वारसा: कोविड काळात राजकारण न पाहता ऑक्सिजन बेड आणि मदतीचा हात दिला होता. विरोधकांच्या टीकेला उत्तर न देता केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेला शैलेश टिळवे, बबन डिसोजा, मेघश्याम काजरेकर, दिनेश घोगळे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

“ही निवडणूक वैयक्तिक टिकेची नसून कोलगावच्या अस्तित्वाची आणि विकासाची आहे. ७ फेब्रुवारीला होणारी निवडणूक शांततेत पार पडेल आणि जनता विकासाला साथ देईल, याची मला खात्री आहे.” — मायकल डिसोजा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here