माजगाव येथे बोलताना मंत्री नितेश राणे सोबत आम दीपक केसरकर, विक्रांत सावंत आदी.
मंत्री नितेश राणे यांचे माजगावमध्ये आवाहन
सावंतवाडी दि.४ : “विक्रांत सावंत हे बिनविरोध निवडून येणार होते, मात्र आमच्याच काही लोकांनी काड्या घातल्यामुळे या ठिकाणी निवडणूक लागली. असे असले तरी विक्रांत सावंत यांचा विजय आता निश्चित आहे. त्यांना केवळ घासून नाही, तर ठासून निवडून आणा,” असे रोखठोक आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भाजप नेते नितेश राणे यांनी आज माजगाव येथे केले.
जिल्हा परिषदेचे भाजपचे अधिकृत उमेदवार विक्रांत सावंत आणि पंचायत समितीचे उमेदवार सचिन बिर्जे यांच्या प्रचारासाठी माजगाव येथील पोपकर हॉलमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नितेश राणे बोलत होते.
विरोधकांवर आणि स्वकीयांवर निशाणा: नितेश राणे म्हणाले की, विक्रांत सावंत यांची लोकप्रियता पाहता ते बिनविरोध निवडून येणे अपेक्षित होते. मात्र, पक्षांतर्गत काही लोकांनी अडथळे निर्माण केल्यामुळे निवडणूक लागली. यावर सध्या सावंत काही बोलणार नाहीत, पण निवडणुकीनंतर मी स्वतः यावर भाष्य करेन, असा इशाराही त्यांनी दिला. विकासाची जबाबदारी माझी: “मी विक्रांतचा मोठा भाऊ म्हणून सत्तेत बसलो आहे. ते जे काही विकासाचे काम सुचवतील, ते मार्गी लावण्याची जबाबदारी माझी आहे,” असा शब्द राणे यांनी माजगाववासीयांना दिला.
विजयाचा विश्वास: सभेतील अलोट गर्दी पाहून राणे यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की, विक्रांत सावंत यांचा विजय ही केवळ औपचारिकता उरली आहे. “मी तर थेट जल्लोषालाच येणार होतो, पण विक्रांतच्या प्रेमापोटी या सभेला आलो आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या सभेला माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, गुंडू जाधव, गुणाजी गावडे, मधू देसाई यांसह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
/——–/——-/—–/
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा*
akhandhindustanlive.com