श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा निमित्त मळेवाड येथे ८ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

रेन्बो फ्रेंड सर्कल कवठणी प्रस्तुत धम्माल दोन अंकी विनोदी नाटक “आलाय मोठा शहाणा” चे आयोजन

मळेवाड येथील पतितपावन मंदीर व पाषाणी मूर्ती

सावंतवाडी,दि.०५: श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्या निमित्त रविवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मळेवाड येथील पतित पावन भक्ती मंदिर ,श्री गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. यानिमित्त सकाळी ६:३० वा. ते ९: ०० वा. पाद्यपूजा व पंचामृत महाअभिषेक,महाराजांची महापूजा, स.९:३० ते १२:०० वा.राम हृदय स्तोत्र अनुष्ठान,सकाळी ८:०० वाजता श्रीं ची महापूजा, सकाळी १०:०० वाजता श्री. ह. भ. प.श्री.गोरे बुवा ,तुळस यांचे सुश्राव्य कीर्तन, दुपारी १२:०० वाजता महानैवेद्य ,दुपारी १२:३० वाजता आरती, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद,झुणका भाकर प्रसादाचे वाटप, दुपारी २:०० वा.पासून गायन, सांस्कृतिक कार्यक्रम,महिला भजन , त्यानंतर “संगीत स्वर रजनी” गायक रुपेंद्र परब आणि साथीदार , सायंकाळी ५:०० ते ६:३० वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ, सरमळे बुवा संजय गावडे यांचा भजनाचा कार्यक्रम. रा.७:०० वाजता महाराजांची पालखी प्रदक्षिणा , रा.८:३० वाजता महाआरती.त्यानंतर रा.९:३० वाजता लेखक वैभव परब , रुपेश कवठणकर दिग्दर्शित ” रेन्बो फ्रेंड सर्कल कवठणी” प्रस्तुत धम्माल दोन अंकी विनोदी नाटक “आलाय मोठा शहाणा” चे आयोजन करण्यात आले आहे.या प्रकट दिन सोहळ्यास भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पतित पावन भक्ती मंदिर,श्री गजानन महाराज सेवा मंडळ, मळेवाड व ग्रामस्थांनी केले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here