न्हावेलीत राजकीय भूकंप: अपक्ष रमेश निर्गुणांची माघार,

सावंतवाडी प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी दिल्या अपक्ष उमेदवार  रमेश निर्गुण यांना शुभेच्छा

अष्टविनायक धाऊसकर यांना पाठिंबा!

सावंतवाडी दि.०५: न्हावेली पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत आता एक मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असताना, अपक्ष उमेदवार रमेश निर्गुण यांनी आपली उमेदवारी मागे घेत भाजपचे अधिकृत उमेदवार अष्टविनायक धाऊसकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे न्हावेली परिसरात भाजपची ताकद प्रचंड वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

पक्षहितासाठी घेतला निर्णय
उमेदवारी मागे घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना रमेश निर्गुण म्हणाले की, “मी भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होतो, मात्र तांत्रिक कारणांमुळे ती मिळू शकली नाही. तरीही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या शब्दाचा मान राखून मी माघार घेत आहे. माझ्यासाठी वैयक्तिक पदापेक्षा पक्षाचे हित आणि भागाचा विकास महत्त्वाचा आहे.”

भाजप ही कार्यकर्त्यांची संघटना – अनिल निरवडेकर
या घडामोडीचे स्वागत करताना सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा सामान्य कार्यकर्त्याला मोठे करणारा पक्ष आहे. निर्गुण यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, नारायण राणे, रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतला आहे. यामुळे भाजपचा विजय आता अधिक सुकर झाला आहे.”

*आमची शक्ती आता दुप्पट -* अष्टविनायक धाऊसकर
भाजप उमेदवार अष्टविनायक धाऊसकर यांनी निर्गुण यांचे आभार मानले. ते म्हणाले की, “सरपंच म्हणून काम करताना मी नेहमी विकासाला प्राधान्य दिले. आता निर्गुण यांच्या पाठिंब्यामुळे आमची शक्ती दुप्पट झाली आहे.” यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. “विरोधक सध्या गोंधळलेले आहेत, त्यांनी आपली नेमकी भूमिका आधी स्पष्ट करावी,” असा टोलाही त्यांनी लगावला.

*विकासाच्या प्रवाहात कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश*
या राजकीय घडामोडींदरम्यान, न्हावेलीतील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गावाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या सभेला भाजपचे अनेक पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
*अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here