सावंतवाडी येथील टी जे एस बी बँकेमध्ये वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्यनारायण पूजे समवेत शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन कुलकर्णी सोबत शाखा व्यवस्थापक आणि शाखेतील कर्मचारी अधिकारी वर्ग
सावंतवाडी शाखेत सत्यनारायण महापूजेचे आयोजन
सावंतवाडी दि.०५: ‘भरोशाची बँक, भविष्याची बँक’ अशी ओळख असलेल्या टीजेएसबी (TJSB) सहकारी बँकेचा ५४ वा वर्धापन दिन गुरुवारी, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी शाखेमध्ये श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती
या मंगलप्रसंगी माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी शाखेला सदिच्छा भेट देऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. शाखेच्या वतीने शाखाधिकारी सुनील परब आणि वरिष्ठ व्यवस्थापक सचिन कुलकर्णी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री सत्यनारायण पूजेचा मान सौ शिल्पा नाईक उभयतांना मिळाला. यावेळी नागेश कांबळे नरेंद्र परब विद्या राऊळ तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होता
यावेळी शहरांतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी बँकेला भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. यामध्ये प्रामुख्याने:
अन्नपूर्णा कोरगावकर (माजी उपनगराध्यक्ष)
अॅड. सुभाष पणदूरकर (माजी अध्यक्ष, सावंतवाडी अर्बन बँक),लक्ष्मण आरोसकर (शाखाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा बँक),बबन साळगावकर (माजी नगराध्यक्ष),सीए लक्ष्मण नाईक, देव्या सूर्याजी (नगरसेवक), अॅड. अभिजीत पणदूरकर, डॉ. काजरेकर,याशिवाय सीमा मठकर, मिलिंद मठकर, व्यापारी मुंज लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अधिकारी आणि कर्मचारी स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ठेवीदार व कर्जदार उपस्थित होते. बँकेची प्रगती आणि परंपरा
बँकेचे अध्यक्ष श्री. शरद गांगल, उपाध्यक्ष श्री. वैभव सिंगवी, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. निखिल आरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत भाविकांनी आणि ग्राहकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. उभाबाजार येथील विठ्ठल मंदिराजवळील बँकेच्या आवारात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.
५४ वर्षांची अखंड परंपरा, विश्वासाची आणि प्रगतीची! 🏦✨
आज टीजेएसबी बँकेच्या सावंतवाडी शाखेत ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. या मंगलमयी सोहळ्याला लाभलेली मान्यवरांची उपस्थिती आणि ग्राहकांचे प्रेम यामुळे हा दिवस अधिकच खास ठरला.