छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत सिंधुदुर्गच्या पतसंस्था प्रश्नांवर मंथन!

छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत सिंधुदुर्गच्या पतसंस्थांबाबत चर्चा करताना राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे सोबत सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ सोबत चेअरमन बाबुराव कविटकर,मेघश्याम चांडक आदी

सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ आणि सैनिक नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर यांची उपस्थिती 

सावंतवाडी दि.०५: महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे नुकतीच ५० कोटींहून अधिक ठेवी असलेल्या पतसंस्थांची राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ आणि सैनिक नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री. बाबुराव कविटकर यांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील पतसंस्थांच्या विविध समस्यांकडे राज्य फेडरेशनचे लक्ष वेधले.

*पतसंस्थांच्या समस्यांवर ‘काका कोयटे’ यांच्याशी सविस्तर चर्चा*
या दौऱ्यात श्री. सुनील राऊळ यांनी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष श्री. काका कोयटे यांची विशेष भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पतसंस्थांना भेडसवणारे कर्जविषयक प्रश्न, ठेवींसाठी विमा संरक्षण, आदर्श उपविधीतील तांत्रिक बाबी, अंशदान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी काका कोयटे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली की, महाराष्ट्र राज्याच्या सहकार कायद्यात बदल करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीवर त्यांची निवड झाली आहे. पतसंस्थांच्या हितासाठी आणि संरक्षणासाठी आपण या कायद्यात अनेक क्रांतिकारक बदल सुचवणार असल्याचे त्यांनी यावेळी आश्वासित केले.

*AI तंत्रज्ञान आणि आधुनिकतेवर भर*
कार्यशाळेत देशभरातील खासगी कंपन्यांनी AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या आधुनिक तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. पतसंस्थांच्या कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी एआय तंत्रज्ञान कसे प्रभावी ठरेल, यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी बुलढाणा अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटीचे चेअरमन श्री. मेघश्याम चांडक आणि राज्य फेडरेशनचे संचालक श्री. भालेराव यांच्यासोबतही राऊळ यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

*सिंधुदुर्ग जिल्हा अधिवेशनाचे आमंत्रण*
येत्या २३ व २४ मे २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘जिल्हास्तरीय पतसंस्था अधिवेशन’ आयोजित करण्यात येणार आहे. या अधिवेशनासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण सुनील राऊळ यांनी काका कोयटे यांना दिले.

या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रातून पतसंस्थांचे चेअरमन आणि सीईओ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे व्यवस्थापक श्री. महेश्वर कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here