जोरदार शक्तिप्रदर्शन ; तळवडेत भाजप जि.प. उमेदवार संदीप गावडे यांची भव्य बाईक रॅली

तळवडे येथील बाईक रॅली मध्ये सहभागी भाजप जि.प.उमेदवार संदीप गावडे सोबत कार्यकर्ते ग्रामस्थ

सावंतवाडी दि.०५: तालुक्यातील तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघ महायुतीचे उमेदवार संदीप गावडे यांनी बाईक रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केल. यावेळी त्यांनी आपल्या विजयासह पंचायत समिती सभापती देखील शिवसेनेच्या सुस्मिता जाधव होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीकडून बाईक रॅली काढण्यात आली.‌ यावेळी जिल्हा परिषद उमेदवार गावडे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी जनतेची साथ विकासाला असून आमचा विजय निश्चित आहे. तसेच हा पंचायत समिती मतदारसंघ सभापती ठरवणार असून महायुतीच्या सभापती विराजमान होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी सभापती पंकज पेडणेकर, शिवसेनेचे सूरज परब, जालिंदर परब आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱8275659563 ,9422054887

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here