निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबोलीत पोलिसांचा पथसंचलन…

आंबोली येथे करण्यात आलेला रूट मार्च

५० होमगार्डसह ‘रूट मार्च; अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दक्ष

आंबोली,दि.०५: ​आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस ठाणे अंतर्गत आंबोली पोलीस दूरक्षेत्राच्या वतीने आज परिसरात रूट मार्च काढण्यात आला. निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच मतदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. हा रूट मार्च आंबोली पोलीस दूरक्षेत्रापासून सुरू होऊन आंबोली एस.टी. स्टँडपर्यंत काढण्यात आला. यामध्ये ४ पोलीस अंमलदार आणि ५० होमगार्ड अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. मुख्य रस्ता आणि बाजारपेठ परिसरातून हा मार्च निघाल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले गेले.​निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि शांततेत मतदान पार पडावे यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. आगामी काळातही संवेदनशील भागात अशाच प्रकारे गस्त आणि संचलन वाढवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887, 8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here