यंदा ‘रेट’ विचारू नका, तर उमेदवाराचे ‘व्हिजन’ तपासा
सिंधुदुर्ग दि.०६: जिल्हाभर निवडणुकांमध्ये गावोगावी चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत त्या ‘नोटांच्या पाकिटां’च्या. काही हजार रुपयांच्या बदल्यात मत विकत घेण्याचे प्रकार सर्रास घडत असल्याच्या चर्चा कानाकोपऱ्यात सुरू आहेत. मात्र, सुज्ञ मतदारांनी यामागचा गंभीर धोका ओळखण्याची गरज आहे.
आज घेतलेली क्षणिक सुखाची रक्कम उद्याच्या पाच वर्षांचा विकास रोखू शकते, हे वास्तव नाकारता येणार नाही. जो उमेदवार आज मत विकत घेण्यासाठी पैसे देतो, तो निवडून आल्यानंतर जनतेची सेवा करण्यासाठी नव्हे, तर खर्च केलेली रक्कम व्याजासह वसूल करण्यासाठीच काम करतो, हे अनेकदा अनुभवास आले आहे.
मतदान हा केवळ अधिकार नाही, तर लोकशाहीतील एक मोठी जबाबदारी आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार पैशांच्या मोबदल्यात गमावण्याचा धोका मतदार स्वतःच ओढवून घेतो.
पूर्वीच्या पिढीतील “आमच्या काळात काम बोलायचं” ही खंत आज अधिक ठळकपणे जाणवते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराने स्वतःला एक प्रश्न विचारणे गरजेचे आहे — “माझ्या एका मताची किंमत काही नोटांपुरती आहे की माझ्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे?”
पैसा आज आहे, उद्या नसेल. मात्र, एक चुकीचा निर्णय संपूर्ण जिल्ह्याला पाच वर्षे मागे नेऊ शकतो. त्यामुळे यंदा ‘रेट’ विचारू नका, तर उमेदवाराचा ‘व्हिजन’ तपासा.
विचारपूर्वक मतदान करा, विकासासाठी मतदान करा — कारण तुमचं मत म्हणजे तुमचं भविष्य आहे!
🛑/——–/——-/—–/🛑——🛑/—–/——–🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


