जि.प.व पं.स.निवडणूक प्रक्रिया शांततेत; महायुती विरोधात अपक्ष लढत; ९ फेब्रुवारीला निकाल
सावंतवाडी दि.०७: तालुक्यात एकूण 9 जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती मतदारसंघातील बांदा जिल्हा परिषद व शेर्ले पंचायत समिती बिनविरोध झाल्याने जि.प.च्या 8 तर पंचायत समितीच्या 17 जागांसाठी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत टक्के मतदान झाले आहे.
मतदान प्रकिया शांततेत पार पडली असली बांदा येथे इव्हीएम मशिन मध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रकिया थोड्या धीम्या गतीने सुरू होती.
दरम्यान तालुक्यात मतदारांची संख्या 1 लाख 4 हजार एवढी असून 67.45 % मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदार राजाच मतदान मतपेटीत बंद झाले असून जनतेचा कौल कुणाला मिळतो ? हे सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा निकालाकडे लागून राहिल्या आहेत.
जिल्हा परिषदच्या 8 जागांसाठी 43 उमेदवार तर पंचायत समितीच्या 17 जागांसाठी 81 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान स्टोररूम मधून 143 केंद्रांवर 18 बसेस मधून मतपेट्या रवाना करण्यात आल्या होत्या. आदल्या दिवशीपासून सर्व मतदान केंद्रे निवडणूक विभागाने ताब्यात घेतली होती. सुमारे 768 मतदान अधिकारी, कर्मचारी व पोलीस होमगार्ड , पोलीस कर्मचारी असे एकूण 1 हजार 268 अधिकारी मतदान केंद्रांवर तैनात ठेवण्यात आले होते. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी खास निवडणूक विभागाने नियोजन केले होते.
माखडोल धवडकी शाळा नंबर 2 मध्ये ‘सखी मतदान केंद्र’ तर माजगाव शाळा नंबर एक मध्ये ‘आदर्श मतदान केंद्र’ उभारण्यात आली होती. ही दोन्ही केंद्र लक्षवेधी ठरली. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व अपंगांसाठी खास मतदान सुविधा ठेवण्यात आली. तालुक्यात एकूण 143 मतदान केंद्र असून या सर्व केंद्रांवर केंद्र अधिकारी तसेच 157 पथके तैनात होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर एक केंद्र अधिकारी व सहाय्यक कर्मचारी तसेच पोलीस होमगार्ड तैनात करण्यात आले होते.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर घारे, सहा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा कार्यरत होती. तर उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आले होता.
तालुक्यात मतदानाचा घटलेला टक्का कुणाच्या फायद्यात पडतो ? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे संदीप गावडे व उध्दव सेनेचे रुपेश राऊळ यांच्यात तर कोलगावाता भाजपचे महेश सारंग व अपक्ष मायकल डिसोजा यांच्यात जोरदार लढत होणार आहे. तर पहिल्यांदाच माजगाव मधून भाजपचे विक्रांत सावंत आपले नशीब आजमावत आहेत. आंबोलीत भाजपच्या शोभा गावडे व शिवसेनेच्या सुप्रिया गावडे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत आहे.
तर, तळवडे पंचायत समिती मतदारसंघातू सभापती ठरणार असून शिवसेनेच्या सुस्मिता जाधव, ठाकरे शिवसेनेच्या श्वेता जाधव, अपक्ष काजल जाधव व प्रज्ञा जाधव रिंगणात आहेत. त्यामुळे बाजी कोण मारत ? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका निहाय मतदान खालील प्रमाणे: वैभववाडी – 54.79 %,दोडामार्ग – 59.83 %
वेंगुर्ला – 69.03 %,मालवण – 58.90 %,देवगड- 57.00 %,कणकवली -59.84 %,कुडाळ – 54 %,सावंतवाडी – 67.45 % सरासरी मतदान 60.11% इतके झाले आहे.
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563