सावंतवाडीत ६ लाखांच्या दारूसह झायलो कार पकडली

जप्त करण्यात आलेल्या मुद्येमालासोबत संशयित

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

सावंतवाडी दि.०६: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलिसांनी जिल्ह्यात सुरू केलेल्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवा-मुंबई महामार्गावर १ लाख ६२ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि ५ लाख रुपयांची झायलो कार, असा एकूण ६ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दिलीप दत्ताराम पवार (वय ५३, रा. सबनीसवाडा, सावंतवाडी) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास वेतीय येथील चॉकलेट फॅक्टरी जवळ पोलिसांनी सापळा लावला होता. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक उघड झाली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस हवालदार बस्त्याव डिसोजा आणि अंमलदार अमर कांडर यांचा समावेश होता. निवडणुकांच्या अनुषंगाने पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम अधिक तीव्र केली आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here