भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत

जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांना लेखी निवेदन सादर करताना सिंधुदुर्ग जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नरसु रेडकर यांच्यासोबत एस. आर. पार्टे, एम. ए. सरमळकर, अय्याज शेख व अश्विनी गावडे आदी

१८ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी ‘काम बंद’ आंदोलन

सावंतवाडी दि.०८:
भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न शासन दरबारी सुटत नसल्याने कर्मचाऱ्यांचा संयम सुटला असून, आता राज्यभरातील कर्मचारी आक्रमक पवित्रा घेत आहेत. महाराष्ट्रातील सर्व विभागांतील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘राज्यस्तरीय कृती समिती’ स्थापन केली असून, या समितीच्या वतीने दि. १८ फेब्रुवारी २०२६ पासून राज्यव्यापी ‘काम बंद’ आंदोलन छेडण्याची अधिकृत नोटीस प्रशासनाला देण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भूमी अभिलेख कर्मचारी संघटनांकडून खातेप्रमुख तसेच महाराष्ट्र शासनाकडे विविध मागण्यांसाठी सातत्याने अर्ज, निवेदने व विनंत्या सादर करण्यात आल्या होत्या. माननीय जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्येही हे प्रश्न मांडण्यात आले. मात्र, शासन व खातेप्रमुखांकडून या मागण्यांकडे गांभीर्याने दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
एकाच झेंड्याखाली ‘कृती समिती’ची स्थापना
न्याय मिळेपर्यंत लढा अधिक तीव्र करण्याच्या उद्देशाने सर्व विभागांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे एकत्र येऊन राज्यस्तरीय कृती समिती स्थापन केली. या समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन व आंदोलनाची अधिकृत नोटीस दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पुढील अधिकाऱ्यांना सादर केली आहे—
ना. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
ना. चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. दिवसे साहेब, जमाबंदी आयुक्त, भूमी अभिलेख, पुणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हालचालींना वेग
या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हालचालींना वेग आला आहे. श्री. नरसु बाबू रेडकर (अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटना) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तृप्ती घोडमिसे (पदसिद्ध उपसंचालक तथा जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग) तसेच मा. सुजितकुमार जाधोर (जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सिंधुदुर्ग) यांना आंदोलनाच्या नोटिशीची प्रत माहितीसाठी सादर केली.
यावेळी कार्यकारिणी सदस्य श्री. एस. आर. पार्टे, श्री. एम. ए. सरमळकर, श्री. अय्याज शेख आणि श्रीमती अश्विनी गावडे उपस्थित होते.

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या संयमाचा अंत; १८ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी ‘काम बंद’ आंदोलन
— सिंधुदुर्ग जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटना प्रतिनिधी

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here