योगशिक्षक शेखर बांदेकर यांना इंडियन आयकॉन अवॉर्ड 2026

शेखर बांदेकर

सिंधुदुर्ग दि.०८: ज्ञान उदय फाउंडेशन राजस्थान यांच्यामार्फत देशभरातील विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो. यात ऑनलाइन आणि ऑफलाईन योगवर्ग या विभागातून योगशिक्षक श्री शेखर बांदेकर यांना इंडियन आयकॉन अवॉर्ड 2026 देऊन गौरविण्यात आले आहे. शेखर बांदेकर हे सिंधुदुर्ग मध्ये फिटनेस योग अकॅडमीच्या माध्यमातून योगाभ्यासाचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपातून देशभर निशुल्क योग वर्ग देखील घेत आहेत ऑनलाइन स्वरूपामध्ये बांदा, सावंतवाडी, कुडाळ, देवगड, कोल्हापूर, पुणे , मुंबई , दिल्ली, गुजरात , राजस्थान, नागपूर अक्कलकोट तसेच अमेरिके मधून देखील बरेच योगाभ्यास प्रेमी योगसाधक दररोज आणि नियमित योगाभ्यास करीत आहेत. ज्ञान उदय फाउंडेशन देशभरातील विविध क्षेत्रांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करीत असते त्या अनुषंगाने निरंतर आणि निशुल्क योग सेवा देणाऱ्या योग शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात येत असतो श्री बांदेकर यांच्या निस्वार्थ योग सेवेची दखल घेत त्यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ज्ञान उदय फाऊंडेशन चे डायरेक्टर नागेश राठोर यांनी देखील त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे तसेच त्याचे सर्वच स्तरावर अभिनंदन होत आहे

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here