सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत ५० किलो माशांसह ५ खलाशी ताब्यात
वेंगुर्ले,दि.११: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या रेडी बंदर येथील सीमाशुल्क प्रतिबंधक पथकाने सागरी गस्त घालताना महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे मासेमारी करणाऱ्या गोव्यातील एका नौकेला पकडले. सीमाशुल्क निरीक्षक दीपक गंगाधर गायकवाड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मासेमारी करताना ही नौका गोवा राज्यात नोंदणीकृत असून तिच्याकडे महाराष्ट्राच्या हद्दीत मासेमारी करण्यासाठी कोणताही वैध परवाना नव्हता. नौकेवरील कर्मचाऱ्यांनी सादर केलेला परवाना हा कालबाधित झाला असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या नौकेवर सुमारे ५० किलो मासे आणि पाच खलाशी मिळून आले आहेत. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौकेवर कोणताही तस्करीचा माल किंवा परदेशी नागरिक आढळले नाहीत. मात्र, परवान्याशिवाय परराज्यातील नौकेने महाराष्ट्राच्या हद्दीत मासेमारी करणे हा नियमांचे उल्लंघन करणारा प्रकार आहे. हे प्रकरण मत्स्यव्यवसायाशी संबंधित असल्याने, पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सदर नौका महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563



सिंधुदुर्गच्या सागरी हद्दीत ५० किलो माशांसह ५ खलाशी ताब्यात