सावंतवाडी नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची घोषणा; सुधीर आडीवरेकर आरोग्य, तर अॅड अनिल निरवडेकर समाजकल्याण सभापती

सुधीर आडीवरेकर
अॅड अनिल निरवडेकर
प्रतिक बांदेकर
मोहिनी मडगावकर
दिपाली भालेकर
मोतीराम उर्फ आनंद नेवगी यांना नियोजन ,जलनिःसारण व पर्यावरण समिती सभापती निवड झाल्यानंतर अभिनंदन करतांना मुख्याधिकारी विनायक औंधकर व अन्य

सावंतवाडी नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड जाहीर 

सावंतवाडी दि.११: सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज जाहीर करण्यात आली. यामध्ये सुधीर आडीवरेकर यांची आरोग्य व क्रीडा सभापतीपदी, तर उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची समाजकल्याण व ज्येष्ठ नागरिक कल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.
नगराध्यक्षा व गटनेत्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडीत सर्वपक्षीय नगरसेवकांना समित्यांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले आहे.

नवनियुक्त सभापती आणि त्यांच्या समित्या:
नगरपरिषदेच्या कामकाजाला गती देण्यासाठी खालीलप्रमाणे सभापतींची नियुक्ती करण्यात आली आहे:
आरोग्य व क्रीडा समिती: सुधीर आडीवरेकर (सभापती)
समाजकल्याण व ज्येष्ठ नागरिक कल्याण: ॲड. अनिल निरवडेकर (सभापती)
नियोजन, जलनिःसारण व पर्यावरण: आनंद नेवगी (सभापती)
पाणी पुरवठा समिती: प्रतिक बांदेकर (सभापती)
महिला व बालकल्याण: दिपाली भालेकर (सभापती)
उद्यान व पर्यटन समिती: मोहीनी मडगावकर (सभापती)
तसेच, महिला व बालकल्याण उपसभापतीपदी सुनिता पेडणेकर आणि पर्यटन उपसभापतीपदी सुकन्या टोपले यांना संधी देण्यात आली आहे.
स्थायी समितीची रचना:
नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले या स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती असतील. सदस्य म्हणून उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, प्रतिक बांदेकर, दिपाली भालेकर आणि मोहीनी मडगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्वपक्षीय सहभाग आणि समन्वय:
या निवडीचे वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी भाजपसह शिवसेना, काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांनाही विविध समित्यांमध्ये सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.
शिवसेना: बाबु कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, स्नेहा नाईक, सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर.
काँग्रेस: तौकीर शेख.
ठाकरे शिवसेना: देवा टेमकर.
या सर्वसमावेशक निवडीमुळे शहराच्या विकासकामांना सर्व पक्षांच्या सहकार्याने गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सावंतवाडी नगरपरिषद सर्व विषय समिती सभापतींचे अभिनंदन करताना मुख्याधिकारी विनायक औधकर

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here