सावंतवाडी गोदामाच्या मागे लवकरच ‘खाऊ गल्ली’ साकारणार… मोहिनी मडगावकर

मोहिनी मडगावकर

सावंतवाडी येथे जागेची पाहणी करतांना पालिकेच्या नवनिर्वाचित उद्यान व पर्यटन सभापती सौ. मोहिनी मडगावकर

जुनी खेळणी बदलणार; महिला व तरुणांना रोजगार निर्मितीवर भर.. मोहिनी मडगावकर यांचा पुढाकार

​सावंतवाडी, दि.१२: शहराच्या पर्यटन वैभवात भर टाकत स्थानिक महिला व सुशिक्षित बेरोजगारांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेतर्फे गोदामाच्या मागे लवकरच ‘खाऊ गल्ली’ साकारण्याचा मानस नवनिर्वाचित उद्यान व पर्यटन सभापती सौ. मोहिनी मडगावकर यांनी व्यक्त केला.

नगरपरिषदेच्या धान्य गोदामामागे असलेल्या आठवडा बाजाराच्या रिकाम्या जागेत लवकरच ‘खाऊ गल्ली’ उभारण्याचा मानस नवनिर्वाचित उद्यान व पर्यटन सभापती सौ. मोहिनी मडगावकर यांनी आज व्यक्त केला. सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सौ. मडगावकर यांनी आज शहरातील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाची आणि परिसराची पाहणी केली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
​यावेळी माहिती देताना सौ. मडगावकर म्हणाल्या की, शहरात अनेक युवक व महिला बेरोजगार आहेत, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने आठवडा बाजाराच्या जागेचा वापर केला जाणार आहे. हा बाजार दर मंगळवारी भरतो, मात्र अन्य वेळी ती जागा रिकामी असते. त्यामुळे आठवड्याच्या बाजारी व्यापाऱ्यांना सुट्टी देऊन त्या ठिकाणी खाऊ गल्ली यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही आणि रोजगाराचे नवीन दालन उभे राहील. यासाठी पालिकेच्या आगामी बैठकीत योग्य तो ठराव घेऊन निर्णय घेतला जाईल.

​सावंतवाडी शहराच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना सौ. मडगावकर म्हणाल्या की, महामार्ग आणि रेल्वे शहराच्या बाहेरून गेल्यामुळे पर्यटक शहराकडे वळत नाहीत. यामुळे स्थानिक हॉटेल व्यवसाय आणि उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. ही शहरासाठी धोक्याची घंटा असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आगामी काळात ठोस धोरण राबवले जाईल. आमचे नेते पालकमंत्री नितेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांना विश्वासात घेऊन शहराच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जुनी खेळणी दुरूस्त व सेल्फी पॉईंट 

​शिवउद्यानाच्या दुरवस्थेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानातील जुनी खेळणी सध्या धोकादायक स्थितीत आहेत. मुलांच्या सुरक्षेचा विचार करून ही खेळणी बदलण्यासाठी तातडीने पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच उद्यानाशेजारी असलेला धोकादायक नाला स्लॅब टाकून बंदिस्त करण्यात येईल आणि शहराच्या समृद्ध संस्कृतीला साजेसा एक आकर्षक ‘सेल्फी पॉईंट’ देखील उभारला जाईल. एमटीडीसीच्या माध्यमातून बसवण्यात आलेली खेळणी पुन्हा सुरू करता येतील का, याबाबतही पालिका प्रशासनाशी सकारात्मक चर्चा केली जाणार आहे

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीआठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________

🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here