‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’च्या सेवाकार्य कौतुकास्पद…

‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’बद्दल
माजी महापौर निर्मला सामंत यांच्याकडून गौरवोद्गार;. “कोणीतरी करेल” ही मानसिकता बदलण्याची गरज…!

​मुंबई,दि.२२: ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’च्या वतीने राबविले जाणारे समाजहित उपक्रम हे केवळ कौतुकास्पद नसून ते अतुलनीय आहेत, अशा शब्दांत मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव केला आहे. समाजासाठी काहीतरी ठोस करण्याची जिद्द, माणुसकी, धैर्य आणि प्रचंड इच्छाशक्ती या गुणांचे दर्शन प्रतिष्ठानच्या कामातून घडते. हे काम अत्यंत खडतर असून ते ईश्वरी प्रेरणेतूनच तुमच्या हातून घडत आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
​समाजात वावरताना बहुतेकांची मानसिकता ही ‘कोणीतरी करेल’ अशी असते, मात्र हे ‘कोणीतरी’ करण्यापेक्षा ‘हे आपण का नाही करावे’ असा विचार करणे गरजेचे आहे. जर समाजातील अवघ्या १० टक्के लोकांनी असा विचार केला, तर देशात मोठे सामाजिक परिवर्तन घडू शकेल, असे मत त्यांनी मांडले. प्रतिष्ठानचे सदस्य कोणत्याही प्रसिद्धीची हाव न धरता अत्यंत निष्ठेने हे कार्य करत आहेत, ही बाब विशेष असल्याचेही त्यांनी नमूद केले. या सेवाकार्याला शुभेच्छा देतानाच, या प्रवासात आपली काय मदत लागेल ती नक्की कळवा, असे आश्वासन देऊन निर्मला सामंत प्रभावळकर यांनी प्रतिष्ठानला आपला पाठिंबा दर्शविला आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here