🌸 वटवृक्षाच्या छायेसारख्या असणाऱ्या आजींना मानाचा मुजरा! 🌸

🌸 🌸जागतिक महिला दिनानिमित्त फिटनेस महिला अकॅडमी, सिंधुदुर्ग ने साजरा केला ‘शंभरी पार’ महिलांचा सत्कार सोहळा! 👵✨

सावंतवाडी दि.०८: शहरातील ५ ज्येष्ठ मातांच्या घरी जाऊन योगसाधकांनी त्यांचे औक्षण केले, शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला आणि त्यांचे मोलाचे आशीर्वाद घेतले. सत्कारमूर्ती आजींच्या चेहऱ्यावरील हास्य आजच्या दिवसाची खरी कमाई ठरली! 😇❤️
📍 ठिकाण: सबनिस वाडा व खासकील वाडा, सावंतवाडी.
या मातांचा झाला सत्कार:
१. श्रीम. मंगला केशव भावे (सबनिस वाडा) २. श्रीम. आनंदी लक्ष्मण सावंत (सबनिस वाडा) ३. श्रीम. सुनीता गजानन बांदेकर (सबनिस वाडा) ४. श्रीम. प्रमिला शिवराम प्रभुदेसाई (सबनिस वाडा) ५. श्रीम. राधाबाई बाबुराव होडावडेकर (खासकील वाडा) यांचा सन्मान करण्यात आला.

या आगळ्यावेगळ्या उपक्रमात अकॅडमीच्या जिल्हाध्यक्ष सौ. रसिका सावंत, उपाध्यक्ष सौ. चेतना शिंदे, कोषाध्यक्ष सौ. निशिगंधा सावंत, सहसचिव सौ. अनघा चव्हाण यांच्यासह योगशिक्षक श्री. शेखर बांदेकर, रामनाथ सावंत, नारायण सावंत आणि अन्य योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या आयुष्याच्या सायंकाळी मिळालेल्या या अनपेक्षित सन्मानामुळे अनेक आजींचे डोळे पाणावले होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here