नवी दिल्ली दि.१६: लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. “सरकार एकीकडे हाय-स्पीड कॉरिडॉरच्या गप्पा मारत असताना, सामान्य रेल्वे प्रवाशांना मात्र मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे,” अशा शब्दांत त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.
सीएसएमटीवर महाराजांच्या पुतळ्याला विरोध का?
खासदार सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे महाराजांचा राजसिंहासनावर बसलेला पुतळा बसवण्यास होत असलेल्या विलंबावर तीव्र संताप व्यक्त केला. “जर केवडिया स्थानकावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहू शकतो, तर शिवरायांच्या नावाने असलेल्या स्थानकावर त्यांचा पुतळा बसवण्यास ‘नीती’चे कारण देऊन नकार का दिला जातो?” असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली.
रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रश्न अद्याप अधांतरी
मुंबईतील ब्रिटीशकालीन नावे बदलण्याच्या आश्वासनांचा त्यांनी समाचार घेतला. निवडणुकीच्या काळात सँडहर्स्ट रोड, मरीन लाईन्स आणि चर्नी रोड या स्थानकांच्या नामांतराचे फलक दिसले, मात्र प्रत्यक्षात काहीच झाले नाही, असे ते म्हणाले. तसेच, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली.
कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि दुहेरीकरणाची मागणी
कोकणवासीयांच्या व्यथा मांडताना सावंत म्हणाले की, सणासुदीच्या काळात कोकण रेल्वेचा प्रवास अत्यंत खडतर होतो. यावर उपाय म्हणून:
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे.संपूर्ण मार्गाचे तातडीने दुहेरीकरण करावे.
कोकणच्या विकासासाठी बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वे दुहेरीकरण अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
बुलेट ट्रेनमुळे घरांना तडे; शेतकऱ्यांचे प्रश्न
बुलेट ट्रेन प्रकल्पावर टीका करताना त्यांनी पालघर जिल्ह्यातील सपाडे परिसरातील घरांचे उदाहरण दिले. टनेलसाठी केलेल्या स्फोटांमुळे सुमारे १०० ते १५० घरांना मोठ्या भेगा पडल्या असून कंत्राटदारांकडून मिळणारी मदत तोकडी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि त्यांच्या वारसांना रेल्वेत नोकरी देण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे वेधले लक्ष केवळ प्रवाशांच्याच नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरही त्यांनी आवाज उठवला.
“मुंबईतील मोटरमन सध्या प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. कामाचे वाढते तास आणि केबिनमधील गोंगाटामुळे अनेक जण राजीनामे देत आहेत,” असे ते म्हणाले.
याशिवाय, ट्रॅकची सुरक्षा करणाऱ्या गँगमन आणि खलाशी यांच्या समस्यांकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


