सावंतवाडी दि.१६: “महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे. वकिलांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, सारासार विचार करूनच आपले मतदान करावे,” असे आवाहन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सावंतवाडी येथे आयोजित वकील संवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेतील वाढता राजकीय हस्तक्षेप आणि वकिलांच्या समस्यांवर जोरदार भाष्य केले.
राजकीय गुलामगिरी स्वीकारणाऱ्यांपासून सावध राहा
निवडणुकीला उभे असलेल्या काही उमेदवारांवर टीका करताना सरोदे म्हणाले की, “जे उमेदवार राजकीय गुलामगिरी स्वीकारून निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या मनात पराभवाची भीती आहे. ते खऱ्या अर्थाने वकिलांचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. महाराष्ट्रात असा अनुभव कुठेच आला नव्हता, मात्र सावंतवाडीत तो पाहायला मिळत आहे.” बार कौन्सिलने वकिलांच्या न्याय्य हक्कांसाठी लढले पाहिजे, समाजात भ्रम पसरवू नये, असेही त्यांनी नमूद केले.
न्यायालय कोणाची खासगी मालमत्ता नाही
न्यायव्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, न्यायालय हे ‘पब्लिक प्लेस’ असून ते संविधानात्मक दृष्टिकोनातून समाजासाठी काम करण्यासाठी आहे. “न्यायालय कोणाच्या मालकीचे नाही. जे निवडून आले आहेत ते केवळ प्रतिनिधी आहेत, मालक नाहीत. न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्यांनी हा गैरसमज दूर करावा,” असा टोला त्यांनी लगावला. तसेच, न्यायाधीशांनी सत्कार स्वीकारताना विचार करावा आणि पोलीस प्रशासनाने निवृत्त न्यायाधीशांचा अवमान करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडीतील कार्यक्रमाला मज्जाव आणि दबावतंत्राचा आरोप
सावंतवाडीतील कार्यक्रमाबाबत बोलताना सरोदे यांनी गंभीर आरोप केले. “येथील खरी वस्तुस्थिती समोर येईल या भीतीने पोलिसांच्या दबावातून या कार्यक्रमात अडथळा आणला गेला. स्थानिक वकिलांवर दबाव टाकण्यात आला. संग्राम देसाई यांनी पदाचा गैरवापर करून कार्यक्रम करण्यास मज्जाव केला असेल, तर अशी व्यक्ती पदावर राहण्यास पात्र नाही,” असे ते म्हणाले. बार कौन्सिलची निवडणूक आता राजकीय होत चालली असून वकिलांना दबावाखाली ठेवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
२ लाख १५ हजार वकिलांच्या कल्याणाचे काय?
“मी स्वतः निवडणूक लढवत नाही, पण समाजासाठी आणि वकिलांच्या हितासाठी महाराष्ट्रभर फिरत आहे. महाराष्ट्रात २ लाख १५ हजार वकील आहेत, त्यांच्या कल्याणासाठी बार कौन्सिलने गेल्या काही वर्षांत काय केले, हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे,” असे सरोदे यांनी म्हटले. तसेच, बार कौन्सिलमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून एक प्रतिनिधी असावा आणि कामकाजात पूर्ण पारदर्शकता असावी, अशी मागणी त्यांनी केली.
बोगस मतदारांचा प्रश्न आणि तक्रारी
बार कौन्सिलच्या निवडणुकीत बोगस नावांचा वापर करून निवडणूक लढवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष कमिटी नेमण्याची गरज व्यक्त केली. “माझ्यावर खोट्या केसेस दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र वकिलांवर अन्याय होऊ देणार नाही,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


