सातार्डा दि.१७: येथील पोलीस दूरक्षेत्राच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, येथे कार्यरत पोलीस कर्मचारी आणि तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. इमारतीचे छप्पर कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त होत असून, या गंभीर प्रश्नाकडे सिंधुदुर्ग जिल्हा अन्याय निवारण समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
पाच वर्षांतच इमारतीची दुरवस्था
सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ पाच वर्षांपूर्वी ही इमारत सिमेंटच्या पत्र्यांचा वापर करून उभारली होती. मात्र, अल्पावधीतच या इमारतीला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. छताला आतून करण्यात आलेले सिमेंटच्या पत्र्यांचे कोटिंग आता निखळून पडू लागले आहे. पावसाळ्यातील ओलावा आणि उन्हाळ्यातील प्रखर उष्णता यामुळे हे पत्रे ठिसूळ झाले असून, कार्यालय, किचन आणि विश्रांती कक्षात हे पत्रे केव्हाही अंगावर पडू शकतात, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे.
अधीक्षकांचे वेधले लक्ष
या इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष साईप्रसाद कल्याणकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची भेट घेऊन त्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
दुरुस्तीसाठी पाठपुरावा करणार: सुदन कवठणकर
या प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे म्हटले आहे. पोलीस आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


