
सावंतवाडी दि.१७: शहराचा पक्षी म्हणून ओळख असलेला भारद्वाज पक्षी मंगळवारी न्यू खासकीलवाडा येथे जखमी अवस्थेत आढळून आला. याबाबत ठाकरे युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांना माहिती मिळताच त्यांनी वनविभागाला पाचारण करत त्यांच्या ताब्यात दिले.
न्यू खासकीवाड्यातील रहिवासी वेलेरियन फुडतडू यांना हा भारद्वाज पक्षी आढळून आला. त्यांनी तातडीने याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांना दिली. श्री सुभेदार यांनी तात्काळ याची दखल घेत वनविभागाला पाचारण केले. जखमी असलेल्या भारद्वाज पक्षीला वनविभागाचे कर्मचारी यांनी दखल घेत पुढील उपचारासाठी नेले.वनरक्षक अमृतकर आणि फाटक यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत भारद्वाज पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत तत्परता दाखविली याबद्दल युवा सेना तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी त्यांचे आभार मानले.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


