माणगावच्या ‘त्रिमूर्ती संगीत विद्यालया’चा तेलंगणात डंका; उद्या होणार २०० वा गीत रामायण कार्यक्रम

कुडाळ/माणगाव दि.१८: कोकणातील कलावैभवाचा वारसा जतन करणाऱ्या माणगाव येथील श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयाने एक मानाचा टप्पा गाठला आहे. या विद्यालयाचा ‘गीत रामायणाचा’ २०० वा ऐतिहासिक कार्यक्रम उद्या, गुरुवार १९ मार्च रोजी तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे सादर होणार आहे. एका ग्रामीण भागातील संगीत संस्थेने परराज्यात जाऊन द्विशतकी कार्यक्रम सादर करणे, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
निजामाबादमध्ये श्रीराम नवमी उत्सवानिमित्त आयोजन तेलंगणा राज्यातील निजामाबाद-गाजुलपेठ, ब्रह्मपुरी येथील श्री बडाराम मठात श्रीराम नवमीनिमित्त नऊ दिवसांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, गुरुवारी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत गीत रामायणाचा हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. ग.दि. माडगूळकर रचित आणि बाबूजींच्या सुरावटीने सजलेल्या या अजरामर गीतांमधील निवडक गीते यावेळी सादर केली जातील.
हे कलाकार करणार सादरीकरण या द्विशतकी कार्यक्रमात श्री राजाराम गव्हाणकर आणि त्यांचे सहकारी प्रमोद मुंडे, संतोष परब तसेच बेलापूर (नवी मुंबई) येथील केंद्र संचालक गोपाळ पाटील आणि नागनाथ पाटील हे आपली कला सादर करणार आहेत.
१९९ वा कार्यक्रम तेर्सेबांबर्डे येथे संपन्न या प्रवासातील १९९ वा कार्यक्रम नुकताच तेर्सेबांबर्डे येथे उत्साहात पार पडला. यावेळी राजाराम गव्हाणकर (गायन व हार्मोनियम), प्रमोद मुंडे (तबला), संतोष परब (निवेदन), बालकलाकार विर आडसरे (ताल साथ) आणि निवृत्त गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब यांनी कोरसची साथ दिली होती.
धार्मिक स्थळांवर उमटलाय ‘त्रिमूर्ती’चा ठसा श्री त्रिमूर्ती संगीत विद्यालयाने यापूर्वी कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, नृसिंहवाडी, चाफळचे श्रीराम मंदिर आणि सज्जनगड यांसारख्या अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी आपली सेवा रुजू केली आहे. गोवा राज्यातही या संस्थेच्या कार्यक्रमांना रसिकांनी मोठी दाद दिली आहे. आता तेलंगणात होणाऱ्या या २०० व्या कार्यक्रमाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here