🚆 कोकण रेल्वेवरून विधानसभेत गदारोळ! सावंतवाडी टर्मिनससह प्रवासी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

सावंतवाडी दि.१८ : मध्ये आज कोकण रेल्वेच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. चे मध्ये विलीनीकरण करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
सावंतवाडीचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला.रेल्वे स्थानकांच्या बाह्य सुशोभीकरणाचे काम माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून झाले असले, तरी स्थानकातील अंतर्गत सुविधा अद्याप अपूर्ण आहेत. या सुविधांसाठी जोपर्यंत विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र सरकारने निधीची तरतूद करावी आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी केसरकर यांनी केली.
कल्याण पूर्व मतदारसंघाच्या भाजप आमदार श्रीमती सुलभाताई गायकवाड यांनी सावंतवाडी स्थानकाबाबत विशेष लक्षवेधी मांडली.आमदार संजय केळकर यांनी देखील कोकण रेल्वे महामंडळाच्या विलीनीकरणाचा विषय सभागृहात लावून धरला.
आमदार सुनील प्रभू यांनी कोकण रेल्वे महामंडळाच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. १९९८ मध्ये शिवसेनाप्रमुखांनी हावडा एक्सप्रेस बंद करून कुर्ला-सावंतवाडी गाडी सुरू केली होती, मात्र आता ती मडगावपर्यंत वाढवण्यात आली आहे. “या गाड्यांमध्ये कोकणी माणसाला तिकीट मिळते का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

👉 माजी मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी टर्मिनसचा मुद्दा लावून धरत, “ट्रेन थांबली नाही तर पर्यटक कसे येणार?” असा सवाल उपस्थित केला.
👉 यांनी रेल्वे मंत्र्यांसोबत तातडीची बैठक घ्यावी, अशी मागणी.
👉 यांनी कोरोना काळात रद्द झालेले थांबे पूर्ववत करण्याची मागणी केली.
👉 यांनी विलीनीकरणामुळे तांत्रिक-आर्थिक प्रश्न सुटतील, असे स्पष्ट केले.
👉 यांचा सवाल – “कोकणी माणसाला तिकीट मिळते का?”
📍 सावंतवाडी स्थानकातील अपुऱ्या सुविधा, रद्द झालेले थांबे आणि दुहेरीकरणाचा प्रश्न यावरून सरकारवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला.
⚠️ मुख्य मागण्या: • कोकण रेल्वेचे तातडीने विलीनीकरण
• सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण करणे
• रद्द झालेले थांबे पूर्ववत करणे
• स्थानकांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करणे
🔥 आता प्रश्न एकच — सरकार यावर तातडीने निर्णय घेणार का?

🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here