सावंतवाडी दि.३०: आपल्या मित्रासोबत मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला सावंतवाडी पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने रत्नागिरी येथे धाडसी कारवाई करत रोखले आहे. ही मुलगी मूळची सावंतवाडीची असून सध्या ती मुंबईत वास्तव्यास आहे. या प्रकरणी तिच्यासोबत असलेल्या तरुणांची आणि सहकाऱ्यांची पोलीस चौकशी सुरू आहे.
मैत्रीला घरच्यांचा विरोध मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी मुंबईत राहत असताना तिथे एका तरुणाशी तिची मैत्री झाली होती. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना ही मैत्री मान्य नव्हती. त्यामुळे तिला काही दिवसांपूर्वी मुंबईहून सावंतवाडीत आणण्यात आले होते. परंतु, तिला पुन्हा मुंबईला नेण्यासाठी तो मित्र आपल्या अन्य काही सहकाऱ्यांसह सावंतवाडीत दाखल झाला.
पोलीस ठाण्यातील हायड्रॅामा या मित्रांसोबत वेगवेगळ्या धर्माचे तरुण असल्याने हे प्रकरण सुरुवातीला पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात दिले होते. मात्र, घरी गेल्यानंतरही ती मुलगी आपल्या निर्णयावर ठाम होती आणि तिने पुन्हा मित्रासोबत मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
रातोरात सूत्रे हलली मुलगी पुन्हा घर सोडून गेल्याची माहिती मिळताच पालकांनी तातडीने सावंतवाडी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे ती मुलगी रेल्वेने जात असल्याचे समजताच, सावंतवाडी पोलिसांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर तिला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणांना रोखण्यात आले.
अल्पवयीन असल्याने नातेवाईकांच्या ताब्यात देणार या सर्वांना आज पहाटे सावंतवाडीत आणण्यात आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, मुलगी आणि तो तरुण एकमेकांना ओळखतात व त्यांचे कुटुंबीय देखील परिचित आहेत. मात्र, मुलगी अद्याप अल्पवयीन असल्याने तिला कायदेशीर प्रक्रियेनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com
———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
_____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा*
https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा*
*बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563


