सावंतवाडी दि.२६ सावंतवाडी नगर परिषदेच्या ध्वजारोहणाचा मान तब्बल चार वर्षानंतर नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांना मिळाला. त्यांच्या हस्ते 77 व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी ध्वजारोहण पार पडले. सावंतवाडी नगर परिषदेवर गेली चार वर्षे प्रशासक होते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये उप नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे ऍड अनिल निरवडेकर यांची बहुमताने निवड झाली. दरम्यान नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले या मॅटर्निटी रजेवर गेल्यामुळे त्यांचा कार्यभार उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आणि यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा मान त्यांना मिळाला. ध्वजारोहणाच्या या सोहळ्यासाठी ऍड अनिल निरवडेकर यांनी गुलाबी फेटा बांधून ध्वजारोहण केले. अत्यंत शिस्तबद्ध रित्या झालेल्या या कार्यक्रमासाठी सावंतवाडी चे आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय सावंतवाडी नगर परिषदेचे नगरसेवक सुधीर आडीवरेकर प्रतीक बांदेकर,आनंद नेवगी तौकीर शेख यांच्यासह नगरसेविका दिपाली भालेकर अॅड सायली दुभाषी मोहिनी मडगावकर आनंद नेवगी स्नेहा नाईक सुनिता पेडणेकर नीलम नाईक आधी सह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



