दोडामार्ग तालुक्यातील पं समितीच्या कोलझर मधून शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस  बिनविरोध निवड

दोडामार्ग दि.२७ दोडामार्ग तालुक्यातील पंचायत समितीच्या कोलझर मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाल्याने तालुक्याच्या राजकारणात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. भाजप–शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक रिंगणात प्रवेश केला होता.त्यांच्या विरोधात सुरुवातीला ठाकरे शिवसेना, वंचित बहुजन आघाडी तसेच काही अपक्ष उमेदवार असे एकूण ५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र आज, दि. २७ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने मोठा राजकीय बदल घडून आला. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी गणेशप्रसाद गवस यांच्या विरोधात उभे असलेल्या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तसेच अवघी काही मिनिट शिल्लक असताना उबाठाचे उमेदवार प्रवीण परब यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि श्री. गवस बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here