सिंधुदुर्ग व्हॉईस ऑफ मीडिया: मुख्यालय जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर, तर दोन विभागांसाठी धावडे आणि सावंत यांची निवड!* ​’व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर; पत्रकारांच्या कल्याणासाठी सिंधुदुर्गात नवी टीम कार्यान्वित

शैलेश मयेकर

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हाध्यक्षपदी शैलेश मयेकर; पत्रकारांच्या कल्याणासाठी सिंधुदुर्गात नवी टीम कार्यान्वित

सावंतवाडी दि.१२​:पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, सन्मान आणि सर्वांगीण कल्याणासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM) या आंतरराष्ट्रीय संघटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली पाळेमुळे अधिक घट्ट केली असून जिल्हाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी शैलेश मयेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा कोकण विभागीय अध्यक्ष कुमार कडलग यांनी मयेकर यांच्या नेतृत्वाखालील नूतन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. या निवडीमुळे संघटनेचा ‘चांदा ते बांदा’ हा विस्तार आता खऱ्या अर्थाने पूर्ण झाला आहे.

जिल्ह्याची भौगोलिक रचना लक्षात घेऊन उत्तर आणि दक्षिण अशा दोन विभागांत संघटनात्मक विभागणी करण्यात आली आहे. उत्तर सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी विष्णू धावडे यांची, तर दक्षिण सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी भूषण सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारितेच्या बदलत्या आव्हानांमध्ये पत्रकारांच्या सामाजिक, आर्थिक आणि मानसिक प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून ही नवी टीम कार्य करणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

​या कार्यकारिणीत कार्याध्यक्ष म्हणून मिलिंद धुरी, भूषण देसाई आणि संजय पिळणकर यांची निवड झाली असून सुयोग पंडित, राजा दळवी, तुळशीदास कुडतरकर आणि जय भोसले यांच्याकडे उपाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. संघटनेच्या बळकटीकरणासाठी अमित पालव (सरचिटणीस), संजय भाईप (सह सरचिटणीस) आणि आनंद कांडरकर (खजिनदार) महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतील. तसेच वासुदेव (नयनेश) गावडे, शंकर जाधव, चिन्मय घोगळे आणि विवेक परब यांची संघटक म्हणून, तर विजय सावंत, नागेश दुखंडे आणि मकरंद मेस्त्री यांची कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली आहे. जनसंपर्क व प्रसिद्धी प्रमुख म्हणून दीपक पटेकर काम पाहणार आहेत.
​विशेष म्हणजे, या टीममध्ये महिला पत्रकारांच्या सहभागावरही भर देण्यात आला असून रुपाली खपाले, प्रिया मिश्रा, रेवती वालावलकर, सानिका वायंगणकर आणि जान्हवी सावंत यांना सहयोगी सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–
◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here