सावंतवाडी दि.१६: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रलंबित आरोग्य प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी येत्या २९ एप्रिल २०२६ रोजी सावंतवाडी येथे “जनता आरोग्य दरबार” आयोजित करण्यात आला आहे. या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सावंतवाडी तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
भवानी मंदिरात होणार मंथन
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कळसुलकर हायस्कूलमधील भवानी मंदिरात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आरोग्य दरबाराचे स्वरूप, तालुक्यातील संस्थांचा सहभाग आणि प्रत्यक्ष आयोजनाबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
पालकमंत्र्यांची उपस्थिती राहणार?
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी आणि सामान्यांचे प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या ‘जनता आरोग्य दरबारा’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती कृती समितीने दिली आहे.
सहभागाचे आवाहन
सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त संस्था आणि मंडळांनी या नियोजनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील खालावलेली आरोग्य यंत्रणा आणि सामान्यांची होणारी गैरसोय या पार्श्वभूमीवर आयोजित या ‘आरोग्य दरबारा’कडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
- “आरोग्य हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटना, मंडळे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे.”— एन.बी. रेडकर व राजू केळुसकर (कृती समिती)
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com ———————————–◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*_____________________🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com _____________________🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com 📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


