📍 सावंतवाडी (मळगाव घाटी) दि.२१: सावंतवाडी-बेळगाव मार्गावर आज सायंकाळी लग्नावरून परतणाऱ्या शिरसाट कुटुंबीयांच्या कारला मळगाव घाटीत भीषण अपघात झाला. डिके टुरिझम हॉल परिसरात इको कार थेट दरीत कोसळली.
🔥 गांधील माशांचा हल्ला तरीही मदतीसाठी धावले देवदूत!
अपघात घडल्यानंतर जखमींना वाचवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी धाव घेतली, मात्र तिथे असलेल्या गांधील माशांनी बचावकर्त्यांवर हल्ला केला. अशाही परिस्थितीत माशांचा डंख सोसून खालील तरुणांनी आणि पोलिसांनी जखमींना बाहेर काढले:✅ रवी जाधव, मायकल डिसोजा, विशाल बांदेकर, राजू, राहुल, मनोज नार्वेकर, नारायण चव्हाण, बाळा नार्वेकर, शुभम कळसुलकर, सुधीर जडिये, राकेश मसुरकर, अजित जाधव आणि पोलीस कर्मचारी.
कशी आहे परिस्थिती?
🤕 जखमी: ४ जण (सावंतवाडी सालईवाडा येथील शिरसाट कुटुंब).
🏥 सर्व जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.🚗 गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.लग्नाचा आनंद साजरा करून घरी परतताना काळाने हा घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जखमींना वाचवण्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या त्या ‘देवदूतांचे’ सर्वत्र कौतुक होत आहे.
🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com 🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :📱9422054887,8275659563


