🚨 सावंतवाडीकरांच्या संयमाचा अंत! पाण्यासाठी नगरपरिषदेवर धडकणार ‘घागर मोर्चा’ 🚨

सावंतवाडी दि.२२: शहरातील गॅस पाईपलाईन आणि नळ पाणी योजनेच्या कामात जुन्या जलवाहिन्या फुटल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक भागात गेल्या ४ दिवसांपासून पाणी नाही, तर काही ठिकाणी गढूळ पाणी येत आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की:
❌ केवळ वेळ बदलून चालणार नाही, तातडीने दुरुस्ती करा.
⚠️ ४ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महिलांसह नगरपरिषदेवर ‘आक्रोश मोर्चा’ काढणार!

प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आता तरी प्रशासनाला जाग येणार का?
यावेळी नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी महिलांच्या व्यथा मांडताना सांगितले की, वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नाही. नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत असून आता घागर मोर्चा काढल्याशिवाय पर्याय उरलेला नाही.यावेळी देव्या सुर्याजी, ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, क्लेटस फर्नांडिस, अर्चित पोकळे यांसह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here