📢 सावंतवाडी नगरपरिषदेची उद्या ‘वादळी’ सर्वसाधारण सभा!

सौ श्रद्धाराजे सावंत-भोसले, नगराध्यक्षा
अॅड अनिल निरवडेकर, उपनगराध्यक्ष

सावंतवाडी दि.२३: नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा उद्या, २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता ‘लोकमान्य टिळक सभागृहात’ आयोजित करण्यात आली आहे.

🎯 या सभेची मुख्य आकर्षणे:
✅ पहिलीच सभा: नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांच्या अध्यक्षतेखालील ही पहिलीच सर्वसाधारण सभा आहे.
प्रभारींचा धडाका: प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी ‘नायक’ स्टाईलने १०० हून अधिक विकासकामांना दिलेली मंजुरी चर्चेत.मॅटर्निटी लिव्हनंतर नगराध्यक्षांचे पुनरागमन
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले या निवडून आल्यानंतर काही काळ प्रसूती रजेवर (मॅटर्निटी लिव्ह) होत्या. त्यांनी २० मे पर्यंत रजेचा अर्ज दिला होता, मात्र शहर विकासासाठी त्या वेळेआधीच, म्हणजेच १ एप्रिलला कामावर हजर झाल्या आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाची धुरा अत्यंत प्रभावीपणे सांभाळली होती.
प्रभारी नगराध्यक्षांचा ‘अनिल कपूर’ स्टाईल धडाका
अनिल निरवडेकर यांचा कार्यकाळ एखाद्या ‘नायक’ चित्रपटातील अनिल कपूर यांच्या कामाच्या धडाक्याप्रमाणे राहिला. त्यांच्या प्रभारी काळात त्यांनी तब्बल १०० हून अधिक विकासकामांना मंजुरी दिली. यामध्ये:
कंत्राटी कामगारांच्या वारसांना कायमस्वरूपी कामात सामावून घेणे. बॅ. नाथ पै सभागृहासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करणे. इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याच्या दिशेने ठोस पावले उचलणे.अशा महत्त्वाच्या निर्णयांचा यात समावेश होता. त्यांच्या या कामाच्या झंझावातामुळे शहरात मोठी चर्चा होती.
महत्त्वाचे मुद्दे: ५७ कोटींची नळपाणी योजना, गॅस पाइपलाइनमुळे झालेली दुरवस्था आणि महायुतीतील ‘कडवा’ विरोध, यावर सभा गाजणार का?
नगराध्यक्षांच्या पहिल्याच सभेत काय निर्णय होतात, याकडे साऱ्या शहरवासीयांचे लक्ष!

सावंतवाडी नगरपरिषद: उद्याची सभा ठरणार निर्णायक! 🏛️
📍 स्थळ: लोकमान्य टिळक सभागृह
⏰ वेळ: सकाळी ११:०० वाजता
🔥 सभेचा अजेंडा:
🔹 नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोंसले यांची पहिली सभा.
🔹 ५७ कोटींची नळपाणी योजना चर्चेच्या केंद्रस्थानी.
🔹 गॅस पाइपलाइनच्या कामाबाबत नागरिकांचा रोष.
🔹 सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत विरोध.
काय होईल सावंतवाडीकरांचे काय? उद्याच्या सभेवर लक्ष! 👀

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here