महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पहाटेचा झंझावात’ शांत

 

उपमुख्यमंत्री अजित पवार 

सावंतवाडी दि.२८: प्रशासनावर उत्तम पकड असलेला, कार्यकर्त्यांची नस जाणणारा आणि राज्याचे राजकारण नेहमी स्वतःभोवती फिरवत ठेवणारा एक धडाडीचा नेता हरपला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन हे संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारे आहे, अशी भावना मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी व्यक्त केली.

प्रशासनावरील पकड आणि कामाचा उरक
अजितदादांच्या निधनावर शोक व्यक्त करताना ॲड. केसरकर म्हणाले की, “दादांची कामाची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध आणि निराळी होती. पहाटेपासूनच कामाला सुरुवात करून सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होणारा असा हा लोकनेता होता. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.”

“अजितदादांशिवाय राज्याचे राजकारण पुढील काही वर्षे तरी निस्तेज वाटेल. त्यांच्या जाण्याने एका पर्वचा अंत झाला आहे.” — ॲड. अनिल केसरकर (जिल्हाध्यक्ष, मनसे)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here