सावंतवाडी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन; अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही संपन्न

सावंतवाडी दि.१३:  शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या, नरेंद्र डोंगर येथील बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे भूमिपूजन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाले. सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याच सोहळ्यात सावंतवाडी शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाला अधिक बळकटी देण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन कचरा संकलन वाहनांचा आणि अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही पार पडला. तसेच, लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:आमदार: दीपक केसरकर,जिल्हा परिषद अध्यक्ष: प्रमोद कामत,जिल्हा बँक अध्यक्ष: मनीष दळवी,नगराध्यक्षा: सौ. श्रद्धा सावंत – भोंसले,उपनगराध्यक्ष: ॲड. अनिल निरवडेकर,युवराज: लखम राजे भोसले,मुख्याधिकारी: विनायक औंधकर यांच्यासह आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, सभापती आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, दीपाली भालेकर, मोहिनी मडगांवकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, माजी जि.प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी नगरसेवक राजू बेग, उदय नाईक, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर, नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, तसेच दिलीप भालेकर, अभियंता तुषार सरडे, ठेकेदार प्रताप मूर्ती, मेहर पडते, संतोष पालेकर, अर्चित पोकळे आणि पालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराच्या विकासाला नवी गती
नरेंद्र डोंगरावरील ‘मेडिटेशन योगा सेंटर’मुळे सावंतवाडीच्या पर्यटनाला आणि नागरिकांच्या स्वास्थ्याला मोठा फायदा होणार आहे. तसेच नवीन अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे शहर स्वच्छतेत आणखी गुणात्मक बदल पाहायला मिळतील.सावंतवाडी नगरपरिषदेने एकाच वेळी आरोग्य, स्वच्छता आणि कर्मचारी कल्याण या तिन्ही आघाड्यांवर महत्त्वपूर्ण पावले टाकल्याने नागरिकांमधून या विकासकामांचे जोरदार स्वागत होत आहे.

🛑/——–/——-/—–/🛑——🛑–/——-/
*अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा* akhandhindustanlive.com —————-◾ *अखंड हिंदुस्तान लाईव्ह न्यूज*
🪐 *वेबसाईट* : hindustanlivenh@gmail.com
🪀 *आमच्या Whatsapp ग्रुपमध्ये पुढील लिंक वर क्लिक करून सामील व्हा* https://akhandhindustanlive.com
📹 *व्हिडिओ ला like, share आणि चॅनलला subscribe जरूर करा* *बातम्या आणि जाहिरातींसाठी* संपर्क :
📱9422054887,8275659563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here