सावंतवाडीत मराठा समाज बांधवांकडून जननेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

सावंतवाडी दि.२९: सावंतवाडीत अखिल भारतीय मराठा समाज शाखेतर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री, जननेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्पष्टवक्तेपणा, कामाचा वेग आणि कोकणाबद्दलची आस्था असलेला एक हक्काचा माणूस आपण गमावला आहे. दादा, आपल्या स्मृती कायम जनमानसात राहतील.अशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.आरपीडी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये झालेल्या या शोकसंभेला मराठा समाजाचे पदाधिकारी विनय गायकवाड, विशाल सावंत, अभिजित सावंत, मनोज घाटकर, दिगंबर नाईक, धोंडी दळवी, बापू राउळ, आनंद नाईक, शांताराम पारधी, मनीष गावडे तसेच नगरसेवक देवेंद्र टेमकर आणि मायकल डिसोजा यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


