🚩 भोसले सैनिक स्कूलमध्ये ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उत्साहात साजरा! 🚩

🚩 🚩शैक्षणिक वाटचालीत मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव! ✨

भोसले सैनिक स्कूलमध्ये नारीशक्तीचा सन्मान करताना संस्थेच्या अध्यक्षा ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले, सोबत  डॉ. रत्नेश सिन्हा,  सॅव्हीओ फर्नांडिस, सुनेत्रा फाटक, प्रियंका देसाई, प्राची कुडतरकर, प्रीती डोंगरे, वैशाली आरोसकर आदी

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले सैनिक स्कूल येथे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून संस्थेच्या उभारणीत आणि प्रगतीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या महिलांसाठी ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ थाटात पार पडला.

🌟 सन्मानित नवदुर्गा:
🔹 ॲड. डॉ. अस्मिता सावंत भोसले (अध्यक्षा) ➔ ‘बीकेसीच्या तेजस्विनी’
🔹 सुनेत्रा फाटक ➔ ‘कर्मयोगी नवदुर्गा’
🔹 प्रियंका देसाई ➔ ‘संगोपनशील दुर्गा’
🔹 प्राची कुडतरकर ➔ ‘संस्कृती व नेतृत्वशक्ती’
🔹 प्रीती डोंगरे ➔ ‘अचूकतेचा आधारस्तंभ’
🔹 वैशाली आरोसकर ➔ ‘कार्यक्षमतेचा आधारस्तंभ’
🔹 मारिया फर्नांडिस, अपर्णा केदार, रंजना बोयान ➔ ‘सेवाशक्ती’

शौर्य केवळ रणांगणावरच नाही, तर शिक्षण आणि समाजोपयोगी कार्यातूनही दाखवता येते, हा महत्त्वाचा संदेश या सोहळ्यातून छात्रसैनिकांना मिळाला. यावेळी शाळेचे कमांडंट ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा व प्राचार्य सॅव्हीओ फर्नांडिस उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here