सावंतवाडीत अंदर बाहर जुगार अड्ड्यावर छापा

अकरा जणांवर गुन्हा दाखल ५ लाखांचा ऐवज जप्त 

सावंतवाडी दि.३१: शहरातील बाहेरचावाडा येथील नायरा पेट्रोल पंपा नजीक रफिक जाकीर नाईक याच्या घरावरील गच्चीवर खेळल्या जाणाऱ्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. याप्रकरणी एकूण अकरा जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संशयित रफिक हा आपल्या घरी काही लोकांसह अंदर बाहर जुगार खेळवात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खंदरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू सावळ पो हवालदार महेश जाधव, पो. मनोज राऊत, पो. मयूर सावंत, पो. हनुमंत धोत्रे यांनी रात्री उशिरा छापा टाकत कारवाई केली.

या छाप्यामध्ये २७,५०० रोख रक्कम, ३ मोटर सायकल, १३ मोबाईल असा सुमारे ५ लाख रुपयेच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित अरुण गफार मेमन, जय खलील बक्कर, शफीउल्ला इनायतउल्ला खान, माजीन असलम बेग, नफीस शफी शेख, अरबाज नजीर मकानदार, आफताब युसुफ मेमन, मतीन नसरुद्दीन शहा, हंजला रफिक नाईक, तौसीब सलीम शेख सर्व रा. बाहेरचा वाडा आणि अनिल सिताराम मोरे रा. पान बाजार कुडाळ आदींवर मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here