स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलची ‘ कु. हिना सारंग ‘हिचे विभागस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्तुंग यश

कु.हिना सारंग

कोल्हापूर दि.३१: येथील पॉवरलिफ्टिंग असोसिएशन तर्फे आयोजित शालेय विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सावंतवाडी येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या ‘ कु. हिना जासिम सारंग ‘ हिने ४० किलो वजनी गट स्पर्धेत ५५ किलोचे वजन उचलून द्वितीय क्रमांकाचे स्थान पटकावले. तसेच कु. हिना सारंग हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून तिच्या पालकांनी, प्रशिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी व शाळेचे संचालक श्री. रूजुल पाटणकर तसेच मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील खूप कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कु. हिना जासिम सारंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here