ऐन दिवाळीत BSNL चे नेटवर्क ठप्प! सावंतवाडीत ग्राहक संपर्कहीन; नागरिकांमधून तीव्र संताप!

सावंतवाडी दि.०५: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी बीएसएनएल (BSNL) च्या ढासळलेल्या सेवेमुळे सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बीएसएनएलचे नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुन्हा सेवा गायब झाल्याने नागरिक संपर्कहीन झाले.

सणासुदीच्या काळात आप्तेष्टांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे आणि आपत्कालीन प्रसंगी संपर्क साधणेही कठीण झाल्याने बीएसएनएलच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक ग्राहक असूनही अशी दुरावस्था झाल्याने तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

📲 अधिक माहितीसाठी आणि ताज्या अपडेट्ससाठी फॉलो करा: अखंड हिंदुस्थान लाईव्ह – क्षणाक्षणाची खबर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here