सावंतवाडी नगर परिषदेच्या मासिक सर्वसाधारण सभेत गुरुवारी तुफान राजकीय नाट्य पाहायला मिळाले. पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवकांमध्ये तीव्र खडाजंगी उडाली! 🗣️⚡
📌 सभेतील प्रमुख घडामोडी व वाद: 👇
🔹 बांदेकरांचा राजीनामा अन् आरोप-प्रत्यारोप:
“पाणीपुरवठा विभागातील बिले मंजूरच झाली नाहीत, त्यामुळे बांदेकर निर्दोष आहेत,” असे नगराध्यक्ष श्रद्धा राजे सावंत भोसले यांनी स्पष्ट केले. यावर भाजपचे सुधीर आडीवरेकर यांनी, “जर बांदेकर निर्दोष होते, तर मग शिंदे गटाने पत्रकार परिषद घेऊन त्यांची नाहक बदनामी करत राजीनामा का मागितला?” असा थेट सवाल करत शिंदे गटाला धारेवर धरले! 🔥
🔹 काँग्रेस नगरसेवक तौकीर शेख यांचा थेट घाणाघात:
काँग्रेसचे तौकीर शेख यांनी, “सभापती बांदेकर पूर्णपणे निर्दोष असून या गैरव्यवहाराला मुख्याधिकारी विनायक ओंधकर जबाबदार आहेत; त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासा!” असा गंभीर आरोप केला. तर मुख्याधिकाऱ्यांनी सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. 📞💥
🔹 पक्षाच्या बदनामीसाठी राजीनामा – नगराध्यक्ष:
“भाजपची बदनामी टाळण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसारच बांदेकर यांचा राजीनामा घेण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी होईल,” असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. 🏛️
🔹 मंडई बांधकामातील ३८ लाखांच्या खर्चावरून वाद:
संत गाडगे महाराज मंडईच्या बांधकामात पाणी लागल्याने ३८ लाखांचा अतिरिक्त खर्च उद्भवला. यावर भाजपचे नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे व शिंदे गटाचे अजय गोंदावळे यांनी संबंधित आर्किटेक अमित सामंत यांना जबाबदार धरत त्यांना पॅनलवरून हटवण्याची मागणी केली. हा खर्च पालिका फंडातून न देता शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. 💸🏗️
(सौजन्य: पुढील अपडेट्ससाठी पेज फॉलो करा)



